news
Home अकोला सरकारने दिलासा द्यावा! दिवाळी तोंडावर असतानाही मदत नाही; मूर्तीजापूरमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

सरकारने दिलासा द्यावा! दिवाळी तोंडावर असतानाही मदत नाही; मूर्तीजापूरमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

प्रगती शेतकरी मंडळाच्या नेतृत्वात १७ ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम; पासबुकसह कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर ठिय्या देणार. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांचे ‘झोरां-ठिय्या’ आंदोलन!

 


 

मूर्तीजापूर तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह आंदोलनाचा इशारा; ‘येत्या १७  तारखेपर्यंत मदतीची मागणी’

 

मूर्तीजापूर, प्रतिनिधी : विलास सावळे, दिनांक १३/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

दिवाळी अगदी तोंडावर आली असतानाही शासनाकडून अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतीही आर्थिक मदत जमा झालेली नाही, यामुळे मूर्तीजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सरकारने या परिस्थितीची त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

प्रगती शेतकरी मंडळ, जनमंच नागपूर संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना मूर्तीजापूर, न्यू एक क्लब फ्रॉमर्स ग्रुप जुनी वस्ती मूर्तीजापूर आणि तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांनी इशारा दिला आहे की, येत्या १७  तारखेपर्यंत जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत जमा झाली नाही, तर शेतकरी आंदोलन करतील.

  • आंदोलनाची तारीख: येणाऱ्या शुक्रवारी, जो आठवड्यातील सर्वात मोठा बाजार असतो आणि दिवाळीच्या अगदी पूर्वसंध्येला.
  • ठिकाण: तहसील कार्यालयाच्या समोर.
  • स्वरूप: शेतकरी आपल्या कुटुंबासहित ‘झोरां आंदोलन’ आणि बँकेचे पासबुक घेऊन ‘ठिय्या आंदोलन’ करणार आहेत.

राजू वानखडे यांनी मागणी केली आहे की, सरकारने दिवाळी सणापूर्वी तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सरकारने त्वरित दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

यावेळी कृष्णाराव ठाकरे, गोपाल तायडे, कैलास साबळे (स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष), मुन्ना नाईक नवरे (अध्यक्ष न्यू यांग क्लब) आदी प्रमुख उपस्थित होते.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!