news
Home अमरावती P. R. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपकडून पूरग्रस्तांना मोठा आधार! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे ट्रक रवाना

P. R. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपकडून पूरग्रस्तांना मोठा आधार! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे ट्रक रवाना

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागासाठी जीवनावश्यक वस्तू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमरावतीत उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले ग्रुप; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन ट्रक रवाना

 


 

अमरावतीतून जीवनावश्यक साहित्याची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही लाखांचा निधी

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दिनांक १३/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

राज्यातील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या भागातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे जीवनावश्यक साहित्याचे तीन ट्रक रवाना करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथून या मदतीच्या ट्रकांना हिरवी झेंडी दाखवली.

माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या ‘पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप’ने पूरग्रस्तांना सहाय्यता म्हणून जीवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत. यापूर्वीही प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लाख रुपयांचा निधी दिला आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रविंद्र चव्हाण, प्रविण तायडे, राजेश वानखेडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यावतीने दिवाळीनिमित्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या शिधाचे वाटपही करण्यात आले.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!