news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पुणे ‘आम्ही लढणारे मूळचे आदिवासी’: पद्मश्री लक्ष्मण माने यांचा मोठा दावा!

‘आम्ही लढणारे मूळचे आदिवासी’: पद्मश्री लक्ष्मण माने यांचा मोठा दावा!

'ओबीसीमध्ये समावेश करून हक्काच्या जागा चोरल्या'; राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक हक्कांसाठी १६ ऑक्टोबरला पुण्यात क्रांती मोर्चा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘भटक्या विमुक्तांना व्यवस्थेने भिकारी बनविले’: पद्मश्री लक्ष्मण माने यांचा परखड आरोप!

 


 

‘आम्ही मूळचे आदिवासी; ओबीसीतून बाहेर काढा’:  १६ ऑक्टोबरला शनिवारवाड्यावरून क्रांती मोर्चाची हाक

 

पुणे, मॅक्स मंथन डेली न्यूज:

भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यवस्थेवर परखड टीका केली. “ब्रिटिशांविरुद्ध आम्ही भूमिपुत्र म्हणून लढलो, पण त्यांनी आम्हाला जन्मजात गुन्हेगार ठरवले. ८० वर्षे आम्ही मध्ये काढली. आम्ही खरे स्वातंत्र्य सैनिक आणि मूळनिवासी आदिवासी आहोत,” असे ते म्हणाले.

ते म्हणाले, “भटक्या विमुक्तांचा इतिहास लढणाऱ्यांचा आहे; परंतु येथील व्यवस्थेने आम्हाला भिकारी बनविले आहे.”

 

अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी

 

माने यांनी स्पष्ट केले की, भटक्या विमुक्त जाती-जमाती या ओबीसी नाहीत, तर मूळच्या आदिवासी आहेत.

  • ऐतिहासिक संदर्भ: हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटमध्ये भटक्या विमुक्त समाजाचा उल्लेख आदिवासी म्हणून आहे.
  • मागणी: त्यांनी मागणी केली की, भटक्या विमुक्त समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये (Scheduled Tribes) करावा आणि ओबीसीमधून बाहेर काढावे.
  • आरोप: “व्यवस्थेने आम्हाला ओबीसींमध्ये समाविष्ट करून हक्काच्या सतरा आमदार आणि तीन खासदार जागा चोरल्या आहेत. गावगाड्याच्या बाहेर, रानावनात राहणारे असताना आमचा समावेश ओबीसींमध्ये कसा?” असा सवाल माने यांनी उपस्थित केला.

त्यांनी सांगितले की, त्यांना आताच्या आदिवासींच्या यादीमधील काहीही नको आहे. त्यांच्या ज्या साडेपाच टक्के जागा आहेत, त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत, यासाठी हा लढा सुरू आहे. “राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हक्कांसाठी सविनय मार्गाने आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत. आम्ही आदिवासी आहोत आणि आदिवासींच्या सवलती घेणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

 

ऑक्टोबरला क्रांती मोर्चा

 

या मागण्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भटक्या विमुक्त जमाती संघटना आणि भटके विमुक्त आदिवासी फेडरेशन यांच्या वतीने पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार,  १६ ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता शनिवार वाडा (पुणे) येथून क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेला संघटनेचे ज्येष्ठ नेते शिवलाल जाधव, शिदू शिंदे, सरचिटणीस नारायण जावळीकर, ॲडवोकेट दिलीप कुऱ्हाडे, भरत विटकर, मच्छिंद्र चव्हाण, रजनी पाचंगे, सुप्रिया सोळांकुरे, कलावती भाटी, उर्मिला पवार, ॲडवोकेट सुरेखा माने, तसेच निवृत्त जनसंपर्क अधिकारी आणि भटक्या विमुक्त जमाती संघटना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रमेश भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!