news
Home पिंपरी चिंचवड पदवीधर आणि शिक्षकांनो! मतदार नोंदणीला सुरुवात; पुणे विभाग विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जवळ

पदवीधर आणि शिक्षकांनो! मतदार नोंदणीला सुरुवात; पुणे विभाग विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जवळ

पिंपरीतील निगडी प्राधिकरण येथे नोंदणी कक्ष सुरु; नमुना क्र. १८ आणि १९ भरून तातडीने ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष अर्ज करा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विधान परिषद पदवीधर-शिक्षक मतदारसंघ नोंदणी सुरु! – अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर

 


 

पिंपरी विधानसभा मतदारसंघात नोंदणी कक्ष कार्यान्वित; अर्ज करण्याचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारींचे आवाहन

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: १४ ऑक्टोंबर २०२५,मॅक्स मंथन डेली न्यूज:

मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार, पुणे जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे.

या प्रक्रियेसाठी पुणे विभागाचे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (विभागीय आयुक्त, पुणे) आणि पुणे जिल्ह्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून श्री. जितेंद्र डूडी (जिल्हाधिकारी, पुणे) हे कार्यरत आहेत.

 

पिंपरीत नोंदणी कक्ष सुरु

 

पुणे जिल्ह्यातील २०६  पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात पदवीधर व शिक्षक मतदारांची नोंदणी सुरू झाली आहे. मतदारांच्या सोयीसाठी डॉ. हेडगेवार भवन, सेक्टर नं  २६, निगडी प्राधिकरण ४११०४४  येथे मतदार नोंदणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

 

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: दिनांक ६ नोव्हेंबर २०२५
  • प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: दिनांक २५ नोव्हेंबर २०२५
  • अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: दिनांक ३० डिसेंबर २०२५

 

अर्ज प्रक्रिया

 

सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्रीम. अर्चना यादव यांनी आवाहन केले आहे की, पात्र मतदारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत.

  • पदवीधर मतदार: नमुना क्रमांक १८
  • शिक्षक मतदार: नमुना क्रमांक १९

हे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा पद्धतीने सादर करता येतील.

अर्ज नमुने करण्यासाठी:

फॉर्म भरण्यासाठी:


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!