news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पत्रकारितेत ‘सत्य आणि संयमाचा’ समतोल गरजेचा! माधव सहस्त्रबुद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीत मान्यवरांचे मत

पत्रकारितेत ‘सत्य आणि संयमाचा’ समतोल गरजेचा! माधव सहस्त्रबुद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीत मान्यवरांचे मत

माजी महापौर आझमभाई पानसरे यांची विशेष उपस्थिती; 'राजकारणाची वाट लागल्याचे' भाऊसाहेब भोईर यांचे परखड मत. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘निर्भीडता आणि संयम’ यांचा सुवर्णमध्य आवश्यक: ज्येष्ठ पत्रकार मधु जोशी यांचे प्रतिपादन

 


 

ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे यांचा  ७५ वा वाढदिवस उत्साहात; खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार

 

पिंपरी,  प्रतिनिधी शाम सोनवणे, दिनांक १४/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे यांच्या  ७५ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील ऑटो क्लस्टर सभागृहात खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभात बोलताना ज्येष्ठ पत्रकार मधु जोशी यांनी अति निर्भीड पत्रकारिता आणि अति संयमी पत्रकारिता यांचा सुवर्णमध्य साधून काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

सत्य आणि संयमाचा समतोल

 

मधु जोशी म्हणाले की, “निर्भीड पत्रकारिता ही नेहमीच सत्य किंवा खरी पत्रकारिता नसते. त्याला दुसरी बाजू असते. तीही समाजापुढे येणे गरजेचे आहे.” पत्रकारितेत सत्य आणि संयम यांचा समतोल साधला जावा, यावर त्यांनी भर दिला.

पत्रकारितेतील बदल

 

खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी बोलताना पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता यात मोठे अंतर निर्माण झाल्याचे नमूद केले. त्यांनी पिंपरी चिंचवडमधील पत्रकारितेतील दोन टोकाची रूपे सांगताना नंदकुमार सातुर्डेकर (अतिशय स्पष्टवक्ता निर्भीड पत्रकार) आणि माधव सहस्त्रबुद्धे (कोणाशीच वाईटपणा न घेता पत्रकारिता करणारे) यांचा उल्लेख केला. “पत्रकारांनी निर्भीड व स्पष्टपणे लिहावे,” या मताचा मी आहे, असेही खासदार बारणे म्हणाले. नंदकुमार सातुर्डेकर , अविनाश चिलेकर, महेश कुलकर्णी, यांनीही विचार व्यक्त केले.

 

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडचे बहुजनांचे नेते आणि माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी खूप वर्षांनंतर एका सामाजिक कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. हे ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे यांच्यावरील प्रेमाची पावती असल्याचे मानले जात आहे.

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी राजकारणावर भाष्य करताना “राष्ट्रवादीचा भाजप आणि भाजपचा राष्ट्रवादी झाला आहे. राजकारणाची पार वाट लागली आहे,” असे परखड मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला महेश कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर,  माजी नगरसेवक शीतल शिंदे, कामगार नेते यशवंत भोसले, नगरसेवक नारायण बहिरवाडे, मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आबासाहेब ढवळे, डी डी फ़ुगे, शिवाजी तापकीर, श्री अशोक मंगल,श्रीकांत चौगुले लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मनोज मोरे, विश्वास मोरे, सुनील लांडगे, श्री बाळासाहेब ढसाळ, श्री विवेक इनामदार श्री प्रवीण शिर्के, अर्चना मेंगडे,  राजेश मेहता, आज का आनंद चे विवेक गाडे, अनिल वडगुले, अशोक कोकणे , दादाराव आढाव, दिलीप देहाडे, देवा भालके, भीमराव तुरुकमारे, संतलाल यादव,बाबू उर्फ सुनिल कांबळे, दिनेश दुधाळ,महेश कुलकर्णी, संदेश पुजारी, प्राजक्ता जाधव,बालाजी नवले,शाम सोनवणे  यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन बापूसाहेब गोरे आणि भाई विशाल जाधव यांनी केले, तर आभार श्रद्धा प्रभुणे सहस्त्रबुद्धे यांनी मानले.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!