news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या ‘नॉव्हेल ग्रुप’ला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पावती! राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सन्मान

पिंपरी-चिंचवडच्या ‘नॉव्हेल ग्रुप’ला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पावती! राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सन्मान

कला संलग्न शिक्षण, कौशल्य विकास आणि पर्यावरण जनजागृती उपक्रमांना यश; आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची शैक्षणिक भरारी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ला ‘पुणे जिल्हा उत्कृष्ट शाळा पुरस्कार २०२५’ने गौरव

 


 

केरळचे राज्यपाल राजेंद्र जी अर्लेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उपक्रमांची दखल

 

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी शाम सोनवणे, ता.१५ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबवण्यात येणाऱ्या उत्कृष्ट उपक्रमांची दखल घेऊन नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला ‘पुणे जिल्हा उत्कृष्ट शाळा पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण १५ शाळांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्यात नॉव्हेल ग्रुपने पिंपरी चिंचवड शहरातील एक नामांकित संस्था म्हणून आपले स्थान पक्के केले.

हा पुरस्कार सोहळा शनिवारी, ऑक्टोबर २०२५ रोजी आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला केरळ राज्याचे राज्यपाल मा.श्री. राजेंद्र जी अर्लेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. सुरेश जाधव, मुकुंदराव कुलकर्णी, श्री. रघुनाथ देवकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

 

शैक्षणिक धोरणाशी सुसंगत उपक्रम

 

नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, आत्मविश्वास, कौशल्य विकास आणि सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये कला संलग्न शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, क्रीडा व विज्ञान विषयक स्पर्धा, पर्यावरण जनजागृती, स्वच्छ भारत अभियान आणि प्रकल्प आधारित शिक्षण या उपक्रमांचा विशेष समावेश आहे. विद्यार्थ्यांना अनुभवाधिष्ठित आणि आनंददायी शिक्षण देण्यावर संस्थेचा सातत्याने भर असतो.

 

पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्था व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, संस्था सदस्य आणि माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, संस्था सदस्य अश्विनी गोरखे आणि मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड उपस्थित होत्या.

या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार मा.श्री. अमित गोरखे, श्री. विलास जेऊरकर, व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर, हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य श्री. वैभव फंड आणि मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांना जाते.

नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला मिळालेला हा सन्मान त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची पावती असून, भविष्यातील शैक्षणिक वाटचालीत प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!