news
Home पिंपरी चिंचवड दिवाळीपूर्वी ‘पाणीप्रश्न’ मार्गी लावा! रहाटणी-तापकीर नगरमधील नागरिकांच्या गैरसोयीबद्दल नगरसेवकांचे अधिकाऱ्यांना ताकीद

दिवाळीपूर्वी ‘पाणीप्रश्न’ मार्गी लावा! रहाटणी-तापकीर नगरमधील नागरिकांच्या गैरसोयीबद्दल नगरसेवकांचे अधिकाऱ्यांना ताकीद

शास्त्री नगर, दत्त नगरसह अनेक वस्त्यांमध्ये पाणीच नाही; महापालिका अधिकाऱ्यांनी समस्या त्वरित सोडवण्याचे दिले आश्वासन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ऐन दिवाळीत पाणीटंचाई! – रहाटणी-तापकीर नगरमधील समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश

 


 

कमी दाबाने पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय; नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची प्रशासनाला तातडीची सूचना

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले , दिनांक १५/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रहाटणी – तापकीर नगर प्रभागातील नागरिकांना अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शास्त्री नगर, दत्त नगर, नाखते वस्ती, शिवराज नगर, सज्जनगड कॉलनी, पवना नगर रहाटणी आणि तपकीर नगर या भागांमध्ये सकाळ-संध्याकाळ कमी दाबामुळे किंवा पाणीच न मिळाल्याने नागरिक त्रस्त आहेत.

या गंभीर समस्येची दखल घेत स्थानिक नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली.

दिवाळीपूर्वी समस्या मार्गी लावण्याचे निर्देश

 

या बैठकीत नगरसेवक त्रिभुवन यांनी अधिकाऱ्यांना समस्यांचे मूळ शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, “सध्या दिवाळी सणाची धामधूम सुरू आहे आणि ऐन सणामध्ये पाणीप्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांची, विशेषतः महिला वर्गाची, मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही समस्या मार्गी लावावी.

या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ऋषिकेश गेंगजे, जूनियर इंजिनियर समीक्षा मालपुरे आणि कर्मचारी मुकेश भुजबळशेखर साठे उपस्थित होते.

संबंधित अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!