news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड अनधिकृत बांधकामावर कारवाई नाही, मग कर कशाला? PCMC विरोधात सोसायटीचा ‘नो टॅक्स’चा सणसणीत इशारा

अनधिकृत बांधकामावर कारवाई नाही, मग कर कशाला? PCMC विरोधात सोसायटीचा ‘नो टॅक्स’चा सणसणीत इशारा

'ई' क्षेत्रीय कार्यालय आणि आयुक्तांच्या दुर्लक्षामुळे 'अलंकापुरम फेज-३' मध्ये संताप; सुव्यवस्था ढासळल्याने नागरिकांची आक्रमक भूमिका. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘आयुक्त जाणुनबुजून कानाडोळा करत आहेत’ – कडे थकबाकीदार मालमत्ता कर न भरण्याचा सोसायटीचा ‘अनोखा’ इशारा!

 


 

वडमुखवाडीतील ‘अलंकापुरम फेज-३’ सोसायटीत अनधिकृत बांधकामांमुळे गोंधळ; स्थानिक आमदारांकडून अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा गंभीर आरोप

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, १५ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वडमुखवाडी () येथील ‘अलंकापुरम फेज-३ सहकारी गृहरचना संस्था मर्यादित’ मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महापालिका आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत. वारंवार तक्रारी करूनही आयुक्त जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, स्थानिक आमदारांच्या दबावाखाली अधिकारी कारवाई टाळत असल्याचे सोसायटीचे म्हणणे आहे.

कारवाई न झाल्यास सोसायटीतील सर्व सभासद एकमताने ठराव पास करून यापुढे महापालिकेला कुठल्याही प्रकारचे कर भरणार नाहीत, असा ‘अनोखा’ आणि सणसणीत इशारा सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांनी दिला आहे.

नेमका काय आहे वाद?

 

  • मूळ मुद्दा: सोसायटीला महापालिकेकडून बांधकामाचा परवाना () आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट () प्राप्त झाल्यानंतरही काही सभासदांनी वेगवेगळ्या प्रकारे अनधिकृत व वाढीव बांधकाम केले आहे.
  • तक्रारींची मालिका: सोसायटीचे सचिव शिवकुमार गिरप्पा यांनी ८  ऑक्टोबर २०२४ पासून च्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाकडे रीतसर तक्रारी दाखल केल्या आहेत. महापालिकेने (१०/१२ /२०२४ आणि ०३/०९/२०२५ रोजी) नोटिसा जारी करूनही अनधिकृत बांधकाम थांबले नाही.
  • कारवाईवर दबाव: स्थानिक नागरिकांच्या मतानुसार, काही स्थानिक कार्यकर्ते व स्थानिक आमदारांच्या दबावामुळे अधिकारी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.
  • दादागिरीचा आरोप: सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी लेखी नोटीस देऊनही संबंधित सभासद कोणत्याही प्रकारची गंभीर दखल घेत नाहीत. उलट, “तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही कुठल्याही फालतू नोटिसांना घाबरत नाही,” अशा प्रकारची भाषा बोलत असल्याने सोसायटीतील सुव्यवस्था ढासळत असून वादविवादाचे प्रश्न वाढत चालले आहेत.

अलंकापुरम फेज- सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय कोळप आणि सचिव अजित गायकवाड यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात तातडीने बांधकाम विभाग आणि धडक कारवाई अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. अधिनियमानुसार कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतरचे बांधकाम अनधिकृत घोषित करून त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!