news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पुणे दिवाळीपूर्वी ‘शुद्धतेची मोहीम’! पुणे FDA कडून खवा, तूप, खाद्यतेल भेसळीवर कडक कारवाई, ६५४ नमुने घेतले

दिवाळीपूर्वी ‘शुद्धतेची मोहीम’! पुणे FDA कडून खवा, तूप, खाद्यतेल भेसळीवर कडक कारवाई, ६५४ नमुने घेतले

₹ १.९७ कोटींचा माल जप्त; ५ नमुने अमानक आढळले, अन्न भेसळ आढळल्यास १८०० २२२ ३६५ वर तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

₹ २ कोटींचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त! – पुणे FDA ची सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

 


 

‘सन महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षेचा’ मोहिमेअंतर्गत १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस

 

पुणे, दि. १७ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:  उत्सवाच्या काळात सार्वजनिक आरोग्य आणि ग्राहक सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे FDA मंत्री नर्हरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ‘सन महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षेचा’ या मोहिमेअंतर्गत FDA च्या पथकाने भेसळयुक्त अन्नसाठ्यावर छापे टाकून तब्बल ₹ १.९७  कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त केला आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.
  • तपासणी: विभागाने एकूण ३५३ (तीनशे त्रेपन्न) अन्न आस्थापनांची तपासणी केली.
  • नोटीस: यापैकी १९६  आऊटलेट्सना सुधारणा नोटीस  Improvement Notice बजावण्यात आली.
  • नमुने संकलन: तपासणी दरम्यान ६५४ अन्न नमुने (ज्यात खवा, स्वीट मावा, तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, लोणी, वनस्पती आणि भगर यांचा समावेश आहे) तपासणीसाठी जमा करण्यात आले.
जमा केलेल्या नमुन्यांपैकी २१६  नमुन्यांचे आतापर्यंत विश्लेषण झाले आहे:
  • मानक दर्जा: १९० नमुने मानक दर्जाचे  Standard Quality आढळले.
  • अमानक: नमुने अमानक  Substandard, नमुने गैरब्रँडेड  Misbranded तर १३ नमुने जनआरोग्यासाठी असुरक्षित Unsafe आढळले आहेत.
अन्न सुरक्षा नियमांनुसार दोषींवर कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. FDA पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश अण्णापुरे यांनी नागरिकांना सणासुदीच्या काळात सतर्क राहण्याचे आणि अन्न भेसळीचा संशय आल्यास टोल-फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

©२०२५  मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!