news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील १००० पूरग्रस्त कुटुंबांना पिंपरी-चिंचवडहून मदतीचा हात

बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील १००० पूरग्रस्त कुटुंबांना पिंपरी-चिंचवडहून मदतीचा हात

अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली ब्लँकेट, धान्य किटचे वाटप; पुढील टप्प्यात वह्या, पुस्तके आणि दप्तरांचा 'शिक्षण किट' देण्याची तयारी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

मराठवाडा जनविकास संघाकडून पूरग्रस्तांना मोठी मदत! – १०००

 कुटुंबांना धान्य किटचे वाटप

 


 

‘सेवा हीच ईश्वर पूजा’ या भावनेतून कार्य; आता विद्यार्थ्यांसाठी ‘शालेय साहित्य’ संकलनाचा नवा संकल्प

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १७ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज : मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये ‘सेवा हीच ईश्वर पूजा’ या भावनेतून मोठी मदत मोहीम राबवण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त १००० (एक हजार) कुटुंबांना थेट गावागावात जाऊन अत्यावश्यक साहित्य आणि धान्य किटचे वाटप करण्यात आले. तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर, प्रकाश इंगोले, शाहूराज कदेरे, युवराज माने, संजय माने, गोकुळ शितोळे संतोष भोरे, गणेश गंगाविठ्ठल, विवेक पाटील, सुशांत क्षीरसागर, अशोक भोरे, शंकर तांबे, संतोष तांबे, मनोज मोरे, चंद्रकांत मोरे, सतिश मुरकुटे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किट वाटप करण्यात आले. संघाकडून बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील पूरग्रस्त गावांमध्ये मदत पोहोचवण्यात आली:
  • बीड जिल्हा: शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडी, ब्रम्हनाथ बोरगाव, गात शिरापूर येथे वाटप झाले.
  • धाराशिव जिल्हा: भूम व परंडा तालुक्यांमध्ये किट वाटप करण्यात आले.
या किटमध्ये तांदूळ, डाळी, बेसन, तेल, साखर, मीठ, मिरची पावडर यांसारख्या धान्यासोबतच ब्लँकेट, चटई, साडी, टॉवेल आणि प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचा समावेश होता. या वाटप कार्यक्रमाला तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर, प्रकाश इंगोले यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
‘मन आणि बुद्धी पोसली पाहिजे’ – नवा संकल्प –पूरग्रस्त भागात अन्नधान्य आणि कपडे मिळाल्याने जगण्याचा आधार मिळाला असला तरी, आता शालेय साहित्याची तीव्र गरज जाणवत आहे. पूर ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायला नको, या विचारातून मराठवाडा जनविकास संघाने आता ‘मन आणि बुद्धी पोसली पाहिजे’ या उद्देशाने शालेय साहित्य संकलनाचा नवा संकल्प केला आहे.
  • मदतीचे आवाहन: अरुण पवार यांनी विविध देवस्थाने, प्रार्थनास्थळे आणि मंदिर ट्रस्टला या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली आहे.
  • पुढील टप्पा: येत्या ५ (पाच) ते ७ (सात) ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांसाठी धान्य, गरजू वस्तू आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर, स्टेशनरी यांसारख्या साहित्याचा पूर्ण संच घेऊन मदत टेम्पो रवाना होणार आहे.
नागरिकांनी आपल्या इच्छेनुसार ‘यज्ञात फूल न फुलाची पाकळी’ म्हणून ही मदत अरुण कन्स्ट्रक्शन कार्यालय, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड या ठिकाणी जमा करावी, असे आवाहन अरुण पवार यांनी केले आहे. या मदतकार्यात अनेक संस्थांनीही सहभाग घेतला. सोलापूर जिल्ह्यातील देवगाव (मां), ता. बार्शी येथे पूरग्रस्तांना धान्य किटसह साड्या, ब्लँकेट्स आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील देवगाव (खु.), ता. परांडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आसन पट्टी, टेबल, फॅन, वाचनालय, शैक्षणिक साधने आणि स्कूल बॅग्ज यांचा समावेश असलेले शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. घरकुल विभाग चिखली, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे गुरव, राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपळे गुरव, दत्त मंदिर पिंपळे गुरवचे शंकर कदम, ॲड. प्रतापराव साबळे एस पीज हास्ययोग परिवार, सुदीक्षा फाऊंडेशन, उमा गोपाळे विश्वनाथन, सुमन संभाजी गोपाळे, मुक्ता अतुल दरेकर, श्रुती सतीश पाटील, धनाजी येळकर पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवार शाखा क्रमांक 70 (मारुती घुगे) यांच्यावतीनेही मदत करण्यात आली. यावळी कॅप्टन बालाजी पांचाळ, प्रणव खलाटे, किशोर आटरगेकर, देवगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, अभिजीत शिंदे, कुबेर शिंदे, गटशिक्षण कार्यालयाच्या गोरे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. ही मदत शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी शाहूराज कदेरे, प्रकाश इंगोले यांचे सहकार्य लाभले. उमर शेख यांनी क्रीडा साहित्य, फॅन, माईक या वस्तूंसाठी आर्थिक मदत केली. मराठवाडा जनविकास संघातर्फे सावळेश्वर, ता. मोहोळ, जि. सोलापूर या गावातील शेतकऱ्यांनाही धान्य किटचे वाटप केले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!