86
रेकॉर्डवरील आरोपी व अल्पवयीन मुलांवर कारवाई; दोन बनावटीची पिस्तूल, बुलेटगाडीसह गुन्हा शाखेचे मोठे यश!
हडपसरमध्ये पिस्टलमधून ‘फायरिंग’ करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे शाखा युनिट ३ ची विशेष मोहीम; अवैध अग्निशस्त्रे विरोधी कारवाईत दोन पिस्तूल जप्त
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २० ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साहेब यांनी अवैध अग्निशस्त्रे विरोधी विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची माहिती मिळवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत पुणे शहरातील गुन्हे शाखांना आदेश दिले होते. या आदेशाचे अनुषंगाने पुणे गुन्हे शाखा, युनिट ३ ने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत एका गंभीर गुन्ह्यात कारवाई केली आहे.
गुन्हे शाखा युनिट ३ च्या स्टाफ यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, दिनांक १५/१०/२०२५ रोजी रात्री २१.३० वाजताच्या सुमारास डोक्यावर पगडी बांधलेल्या मुलांनी तक्रारदार इसमास “तू काल आमच्यासोबत का भांडला होता, असे म्हणून शिवीगाळ करून तक्रारदार इसमाच्या दिशेने पिस्तूलमधून फायरिंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला” होता, अशी हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.नं. ८८८/२०२५ अन्वये तक्रार दाखल होती.
या फायरिंगच्या अनुषंगाने आणि तसेच पाहिजे असलेले आरोपी शोध घेत असताना युनिट $\text{३}$ च्या अधिकारी, अंमलदार यांना माहिती मिळाली की, भिमशक्ती नगर, झोपडपट्टी स्पाइन रोड, मोरेवस्ती, चिखली, पुणे येथे काही इसम संशयितरित्या बुलेट गाडीवरून फिरत आहेत. गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे इसम दुचाकी वाहनावरून फिरत आहेत.
गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांनी पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार व सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांना याची माहिती कळवून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ३ च्या स्टाफचे तीन पथक तयार केले.

भिमशक्ती नगर, झोपडपट्टी स्पाइन रोड, मोरेवस्ती, चिखली, पुणे येथे जाऊन सापळा लावून थांबले असता बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचे इसम संशयितरित्या बुलेट गाडीवर थांबलेले दिसले. सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:
१) जप्त मुद्देमाल : १,००,०००/- रुपये किंमतीची एक रॉयल एनफील्ड कंपनीची काळ्या रंगाची बुलेट गाडी.
२) जप्त मुद्देमाल : ८०,०००/- रुपये किंमतीचे दोन देशी बनावटीचे $\text{७.६५}$ एम.एम पिस्तूल.
३) जप्त मुद्देमाल : २,०००/- रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे.
-
एकूण किंमत : एकूण १,८२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलेला आहे.
ताब्यात घेतलेले आरोपी:
सदर इसमांना ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे पुढीलप्रमाणे दिली:
१) विधीसंघर्षीत बालक ‘अ’
२) विधीसंघर्षीत बालक ‘ब’
३) विधीसंघर्षीत बालक ‘क’
तसेच गुन्ह्यातील आरोपी नामे अथर्व सोपान मारणे (वय-१९ वर्षे, रा. राजविलास सोसायटी, प्लॉट नंबर-१६, फेज-१, आंबेगाव खु., पुणे) यास ताब्यात घेऊन सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून वरील मुद्देमाल मिळाला.
सदर विधीसंघर्षीत बालकांकडून पुढील गुन्हे उघड झाले आहेत:
१) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८८८/२०२५
२) एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.नं. ६०६/२०२५ (बीएनएस ३०३(२))
तसेच सदर विधीसंघर्षीत बालकांकडून यापूर्वीचे ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
विधीसंघर्षीत बालकांवर पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती:
-
विधीसंघर्षीत बालक ‘अ’: निगडी पोलीस ठाणे व चिखली पोलीस ठाणे येथे खून, खंडणी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, वाहन चोरी, जबरी चोरी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
-
विधीसंघर्षीत बालक ‘ब’: चिखली पोलीस ठाणे येथे खून, खंडणी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, वाहन चोरी, जबरी चोरी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
-
विधीसंघर्षीत बालक ‘क’: चिखली पोलीस ठाणे येथे खून, खंडणी, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
