news
Home पिंपरी चिंचवड PCMC मध्ये ‘भ्रष्ट’ कारभाराच्या चर्चांना पूर्णविराम? – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची वित्त विभागात बदली

PCMC मध्ये ‘भ्रष्ट’ कारभाराच्या चर्चांना पूर्णविराम? – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची वित्त विभागात बदली

तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांचे निकटवर्तीय म्हणून वादग्रस्त ओळख; उद्यान आणि शिक्षण विभागाच्या कारभारावर भ्रष्टाचाराचा आलेख उंच गेल्याची उघड चर्चा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

बदलीची चर्चा! अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील ‘स्वगृही’; महापालिकेच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

 


 

जांभळे पाटील यांची वित्त विभागात बदली; पिंपरी-चिंचवडकरांमध्ये ‘उत्सवाचे’ वातावरण; नवीन अतिरिक्त आयुक्त म्हणून मोनिका सिंह ठाकूर यांच्या नावाची चर्चा

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ३१ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची आज (शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२५) बदली झाली आहे. ते ज्या शासकीय विभागातून महापालिकेत आले होते, त्याच वित्त विभागात त्यांची बदली झाली असून, यासंबंधीचा आदेश सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महापालिका प्रशासनास प्राप्त झाला.

जांभळे पाटील यांनी २३ सप्टेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांची तीन वर्षांची कारकीर्द मागील सप्टेंबर महिन्यातच संपली होती आणि त्यानंतर एक महिना आठ दिवसांनी त्यांची बदली झाली आहे.

 

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या बदलीचा आदेश महापालिकेत दाखल होताच महापालिका वर्तुळात आणि शहरात ‘उत्सहाचे’ वातावरण पसरले, अशी चर्चा आहे. अनेक नागरिकांनी “बरे झाले भ्रष्ट अधिकारी गेला” अशी भावना बोलून दाखविली.

  • वादग्रस्त ओळख: जांभळे पाटील हे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या नजीकचे म्हणून ओळखले जात होते. महापालिकेत उपायुक्त विकास ढाकणे यांची बदली झाल्यानंतर स्मिता झगडे यांना पदभार मिळणे अपेक्षित असताना, आयुक्त शेखर सिंह यांनी जांभळे पाटील यांना तात्काळ रुजू करून घेतले आणि महापालिकेचा मुख्य कारभार त्यांच्या हाती दिला, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.
  • भ्रष्टाचाराचा आलेख: शहरातील नागरिकांमध्ये अशी भावना आहे की, जांभळे पाटील आणि आयुक्त शेखर सिंह यांनी वादग्रस्त आणि भ्रष्ट कारभार करून महापालिकेला भिकेचे डोहाळे आणले.
  • उघड चर्चा: जांभळे पाटील यांच्या अखत्यारीत असणाऱ्या उद्यान आणि शिक्षण विभागाचा कारभार पाहता, भ्रष्टाचाराचा आलेख खूप उंच गेला असल्याची उघड चर्चा शहरात सुरू होती. 

 

भ्रष्ट कारभाराचा कळस गाठणारे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची मुदत संपल्यानंतर त्यांच्या जागी नवीन अतिरिक्त आयुक्त म्हणून सोलापूर अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून मोनिका सिंह ठाकूर पिंपरी महापालिकेत येणार असल्याची चर्चा होती. जांभळे पाटील यांची बदली झाल्यानंतरही मोनिका सिंह ठाकूर यांचीच चर्चा पुन्हा सुरू झाली आहे, मात्र संध्याकाळपर्यंत त्यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश (Appointment Order) आलेला नाही.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!