news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड सेवाभावाला सलाम! – पीसीएमसीमधून १२ नियत आणि १० स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा

सेवाभावाला सलाम! – पीसीएमसीमधून १२ नियत आणि १० स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा

देवन्ना गट्टूवार, महेंद्रसिंह ठाकूर, सुरेंद्र देशमुखे, डाॅ. सुनीता साळवे यांच्यासह २२ जणांचा सन्मान; प्रमोद जगताप, प्रफुल्ल पुराणिक आणि किरण गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

महापालिकेच्या २२ ‘कर्तृत्ववान’ सहकाऱ्यांना निरोप! सह शहर अभियंता, लेखाधिकारी यांच्यासह अनेकांची सेवापूर्ती

 

 

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते सत्कार; ‘जबाबदार आणि प्रामाणिक’ कामाचा आदर्श घेण्याचे आवाहन

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३१ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी (PCMC) अनेक वर्षे समर्पित सेवा देणाऱ्या २२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सेवापूर्तीचा सोहळा नुकताच पार पडला. माहे ऑक्टोबर २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले १२ आणि स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेले १०, अशा एकूण २२ कर्मचाऱ्यांचा सत्कार महापालिकेच्या वतीने करण्यात आला.

मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव केला. त्या म्हणाल्या, “सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेत अनेक वर्षे जबाबदारीने, प्रामाणिकपणे कामकाज केलेले आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने महापालिकेचा नावलौकिक वाढविणा-या या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आदर्श कार्यरत असणा-या कर्मचा-यांनी घ्यावा.” त्यांनी सर्व सेवानिवृत्तांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभात विविध विभागांतील महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचारी सन्मानित झाले.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले कर्मचारी (१२ जण):

  • देवन्ना गट्टूवार (सहशहर अभियंता)
  • महेंद्रसिंह ठाकूर (उपअभियंता)
  • सुरेंद्र देशमुखे (लेखाधिकारी)
  • शाहिदा सय्यद (मुख्याध्यापिका)
  • सुनिता माने (मुख्याध्यापिका)
  • जयश्री कुदळे (कार्यालय अधिक्षक)
  • हेमलता रायकर (सिस्टर इनचार्ज)
  • मिना संकपाळ (सिस्टर इनचार्ज)
  • सुभाष भोईर (शिपाई)
  • वसंत बेल्हेकर (शिपाई)
  • धनंजय गंगावणे (मुकादम)
  • भरत डाऊल (मजूर)

स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतलेले कर्मचारी (१० जण):

  • डॉ. सुनीता साळवे (ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी)
  • जयश्री मलकेकर (सफाई कामगार)
  • शारदा लोळगे (सफाई कामगार)
  • लिलाबाई बागडी (सफाई कामगार)
  • पुष्पा जगताप (सफाई कामगार)
  • महेश भोसले (सफाई कामगार)
  • हिराबाई धेंडे (सफाई कामगार)
  • गीता चावरिया (सफाई कामगार)
  • अरुण पवार (कचरा कुली)
  • अजिनाथ तेलंगे (गटर कुली)

यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभयचंद्र दादेवार, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे, कार्यकारी अभियंता तथा कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अभिमान भोसले, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी उमा दरवेश, कामगार कल्याण विभागातील मुख्य लिपिक माया वाकडे, तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले, तर प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले आणि किरण गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!