news
Home अमरावती ‘SPQEM’ योजनेचा लाभ न मिळालेल्या मदरशांसाठी संधी! – २०२५-२६ वर्षासाठी प्रस्ताव सादर करा; ३ डी.एड./बी.एड. शिक्षकांना मिळणार मानधन

‘SPQEM’ योजनेचा लाभ न मिळालेल्या मदरशांसाठी संधी! – २०२५-२६ वर्षासाठी प्रस्ताव सादर करा; ३ डी.एड./बी.एड. शिक्षकांना मिळणार मानधन

नोंदणीकृत संस्थांसाठी अर्ज करणे अनिवार्य; जिल्हाधिकारी कार्यालयात १४ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

मदरसा आधुनिकीकरणासाठी सुवर्णसंधी! ‘डॉ. झाकीर हुसेन योजना’ अंतर्गत १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


 

विज्ञान, गणित, इंग्रजी शिक्षकांसाठी मानधन आणि पायाभूत सुविधांसाठी १० लाखांचे अनुदान; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची माहिती

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ४ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अल्पसंख्याक विकास विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’ अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेमुळे मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. इच्छुकांनी दिनांक १४ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

ज्या मदरशांना मदरसा आधुनिकीकरण योजनेचा (SPQEM) लाभ मिळाला नसेल, अशा नोंदणीकृत संस्थांसाठी ही योजना आहे.

प्रमुख लाभ तपशील
शिक्षक मानधन विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि उर्दू या विषयांच्या शिक्षकांना मानधन दिले जाईल. जास्तीत जास्त तीन डी.एड./बी.एड. शिक्षकांना मानधन देय.
पायाभूत सुविधा रु. १० लाख पर्यंत अनुदान देय. (यापूर्वी ज्या प्रयोजनाकरिता अनुदान मिळाले आहे, त्यासाठी पुन्हा देय नाही.)
ग्रंथालय/शैक्षणिक साहित्य फक्त पहिल्यांदा रु. ५० हजार आणि त्यानंतर प्रतिवर्षी रु. ५ हजार अनुदान देय.
शिष्यवृत्ती मदरशांमध्ये राहून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.
शिक्षणाची माध्यमे हिंदी, इंग्रजी, मराठी व उर्दू यांपैकी एका माध्यमाची निवड करून त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक.
  • नोंदणी आवश्यक: मदरसे चालवणाऱ्या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.
  • अर्जाची मुदत: अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक १४ नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे लागतील.
  • प्रस्ताव सादर करण्याचे ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालयातील संवाद शाखा येथील अल्पसंख्यांक कक्ष (प्रस्ताव २ प्रतींत सादर करावा).
  • अधिक माहिती: अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरले जाणार नाहीत.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!