news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड सोशल मीडियामुळे कटाचा पर्दाफाश! – पिस्तूल हातात घेतलेला फोटो स्टेट्सला ठेवला आणि ₹ १ लाख किमतीचे शस्त्र पकडले

सोशल मीडियामुळे कटाचा पर्दाफाश! – पिस्तूल हातात घेतलेला फोटो स्टेट्सला ठेवला आणि ₹ १ लाख किमतीचे शस्त्र पकडले

मा. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशावरून कारवाई; वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाची यशस्वी कामगिरी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

खुनाचा कट उघड! पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ६ अल्पवयीन ताब्यात, देशी बनावटीचे २ पिस्टल जप्त

 


 

इंस्टाग्रामवरील फोटोमुळे आरोपींचा पर्दाफाश; अंडाबुर्जी गाडीच्या वादातून ‘रवी ससाणे’ या व्यक्तीला संपवण्याचा कट

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ७ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका अल्पवयीन मुलाने (विधी संघर्षीत बालक) पिस्तूल हातात घेतलेला फोटो स्टेट्सला ठेवला होता. या माहितीच्या आधारे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने कारवाई करत, एकूण सहा विधी संघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन राऊंड जप्त करण्यात आले असून , एका व्यक्तीच्या खुनाचा कट उघड झाला आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या आदेशावरून करण्यात आली होती, ज्यात आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते.

  • माहिती: खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोउपनि/गायकवाड आणि पोहव/११२१ गणेश गिरीगोसावी हे इंस्टाग्रामवर माहिती घेत असताना , त्यांना ‘adyaa’नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवर एका इसमाने दोन पिस्टल हातात घेऊन फोटो स्टेटस्ला ठेवल्याचे दिसले.
  • पहिला आरोपी ताब्यात: तातडीने पोलीस पथक राजीव गांधी ब्रिज जवळ, श्री शिवाजी शाळेसमोर, औंध पुणे येथे रवाना झाले आणि त्यांनी विधी संघर्षीत बालकाला ताब्यात घेतले.
  • पिस्टल जप्त: या मुलाकडे अधिक चौकशी केली असता, त्याने औंध हॉस्पीटल परिसरातील मैदानात, सांगवी पुणे येथे फिरावयास येणाऱ्या दोन मित्रांची माहिती दिली. पथकाने तिथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले असता, त्यांच्याजवळ ₹ १,०१,०००/- किमतीचे दोन गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन राऊंड मिळून आले.
  • खुलासा: या दोघांनी त्यांना मदत करणाऱ्या आणखी तीन अल्पवयीन मुलांची माहिती दिल्यावर, त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.

 

एकुण सहा विधी संघर्षीत बालकांनी सखोल चौकशीत कबुली दिली की, रवी ससाने, रा. वाघोली, पुणे या व्यक्तीला अंडाबुर्जी गाडीच्या वादातून खुन करण्याचा कट त्यांनी रचला होता. सदरचे दोन्ही पिस्टल व दोन जिवंत राऊंड हे गुरूसिंग, रा. उमराठी, मध्यप्रदेश येथून आणल्याचे त्यांनी सांगितले.

सांगवी पोलीस ठाणे गु. रजि नं. ४५६/२०२५ अन्वये, एकूण ०६ विधी संघर्षीत बालक तसेच पाहिजे आरोपी नामे आर्यन फंड (वय अंदाजे १९ वर्षे) आणि गुरूसिंग (वय अंदाजे २३ वर्षे, रा. उमराठी, मध्यप्रदेश) यांचेविरूध्द भारतीय न्याय संहिता ६१ (२), ३ (४), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२४) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. डॉ. शिवाजी पवार, आणि मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोउपनिरी सुनिल भदाणे, श्रेणी पोउपनि अमर राऊत, सपोउपनि सुनिल कानगुडे, सपोउपनि रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार प्रदिप पोटे, रमेश मावसकर, प्रदिप गोंडाबे, किशोर कांबळे, गणेश गिरीगोसावी, किरण जाधव, भुपेंद्र चौधरी, निलेश जाधव, दादाभाऊ साबळे, भरत गाडे 21 यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!