news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड हुतात्मा चापेकर बंधू स्मारकाचे वातावरण देशभक्तीने भारावले! – मेजर जनरल विश्वासराव यांच्या उपस्थितीत सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन

हुतात्मा चापेकर बंधू स्मारकाचे वातावरण देशभक्तीने भारावले! – मेजर जनरल विश्वासराव यांच्या उपस्थितीत सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन

विद्यार्थ्यांनी जपावी त्याग, शक्ती आणि भक्तीची मूल्ये; डॉ. शिवाजी मुंढे आणि पवन शर्मा यांचे आयोजनात मोलाचे योगदान. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

‘वंदे मातरम्’मधून प्रेरणा घ्या! युवा पिढीने राष्ट्रविकासात योगदान देण्याचे मेजर जनरल विश्वासराव यांचे आवाहन

 


 

यशस्वी एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘वंदे मातरम् सार्थ शताब्दी महोत्सव’ यशस्वी; चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ७ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

भारतीय लष्कराचे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल संजय प्रताप सिंह विश्वासराव यांनी युवा पिढीला ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीतामधून प्रेरणा घेऊन स्वतःला राष्ट्रविकासात योगदान देण्यासाठी सज्ज करण्याचे आवाहन केले आहे. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस (IIMS) व आयबीएमआर (IBMR) यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील हुतात्मा चापेकर बंधू स्मारक येथे आयोजित केलेल्या ‘वंदे मातरम् सार्थ शताब्दी महोत्सवा’ निमित्त ते बोलत होते.

 

मेजर जनरल संजय प्रताप सिंह विश्वासराव यांनी यावेळी क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, विद्यार्थ्यांना राष्ट्राप्रती त्याग, शक्ती आणि भक्ती ही मूल्ये जपण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थितांनी सामूहिक वंदे मातरम् गायन केले, ज्यामुळे वातावरण भारावून गेले होते.

या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व जागृत करण्याच्या उद्देशाने वंदे मातरम् गीताला दीडशेव्या वर्षपूर्ती निमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी एमबीए, एमसीए, बीबीए आणि बीसीए या विद्याशाखांचे विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या वंदे मातरम्च्या उत्स्फूर्त घोषणांनी हुतात्मा चापेकर बंधू स्मारकाचे वातावरण देशभक्तीने भारून गेले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पवन शर्मा यांनी मोलाचे योगदान दिले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!