‘एससी’ आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरण करा! क्रांती महापदयात्रेचे पिंपरी-चिंचवडमध्ये हिंदू मातंग सेनेतर्फे स्वागत
लोकसंख्येनुसार स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी विष्णू कसबे यांची ‘मुंबई ते नागपूर’ पदयात्रा; युवराज दाखले यांचा जाहीर पाठिंबा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ७ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अनुसूचित जाती (SC) समाजाला सध्या मिळत असलेल्या १३% आरक्षणाचे लोकसंख्येनुसार ‘अ ब क ड’ वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी विष्णू कसबे यांनी सुरू केलेल्या क्रांती महापदयात्रेचे पिंपरी-चिंचवड शहरात हिंदू मातंग सेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी लोकसंख्येनुसार अ ब क ड वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण मिळणे आवश्यक आहे. याच मागणीसाठी विष्णू कसबे यांनी मुंबई ते नागपूर क्रांती पदयात्रेचे आयोजन केले आहे.

क्रांती महापदयात्रेचा चौथा मुक्काम देहूरोड येथे पार पडला. त्यानंतर ही पदयात्रा नागपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होताच हिंदू मातंग सेनेच्या माध्यमातून मातंग समाज बांधवांनी या पदयात्रेचे स्वागत केले.
- स्वागताचे ठिकाण: साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे स्मारक, निगडी या ठिकाणी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
- पाठिंबा: हिंदू मातंग सेनेच्या वतीने या मागणीला जाहीर आणि सक्रिय पाठिंबा देण्यात आला, अशी माहिती युवराज दाखले यांनी दिली.

यावेळी हिंदू मातंग सेनेचे अरुण जोगदंड, संजय ससाणे, नाना कसबे, युवराज दाखले, कृष्णा साबळे, मयुर जाधव, शंकर खवळे, उद्योजक बापूसाहेब घोलप, आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व अध्यक्ष गणेश कलवले, जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, नामदेव रिटे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व अध्यक्ष बाबासाहेब रसाळ, ज्ञानेश्वर चव्हाण, अक्षय पौळ, अनिल तांबे, मंगेश डाखोरे, रविभाऊ पाटोळे, महादेव आढागळे, विजु डोलारे, ओमकार गायकवाड, रमेश कांबळे, विजुभारस्कर, समाधान मगर, सागर कापसे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
