news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड हिंजवडीतील दोन बोगस कॉल सेंटर्सवर सायबर पोलिसांचा छापा; ‘क्रेडिट स्कोअर’ आणि ‘हेल्थ स्कॅम’ने अमेरिकन नागरिकांना गंडा!

हिंजवडीतील दोन बोगस कॉल सेंटर्सवर सायबर पोलिसांचा छापा; ‘क्रेडिट स्कोअर’ आणि ‘हेल्थ स्कॅम’ने अमेरिकन नागरिकांना गंडा!

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट-२ आणि सायबर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई; सागर कुमार यादव, आनंद पंकज सिन्हा, धनंजय साहेबराव कासार आणि हर्षद शंकर खामकर यांना अटक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुणे कनेक्शन USA! अमेरिकन नागरिकांना ‘कर्करोग’ आणि ‘टॉल्क पावडर’च्या नावाखाली गंडवणारे दोन अवैध कॉल सेंटर हिंजवडीत उद्ध्वस्त

 

सायबर पोलीस आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मालक, मॅनेजर्ससह ४ अटकेत; लाखो डॉलरची फसवणूक उघड.

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन अनधिकृत कॉल सेंटर्सवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी भागात सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट-२ यांनी संयुक्त छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कॉल सेंटरचे मालक आणि मॅनेजर्ससह एकूण २३ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाखो डॉलरची फसवणूक उघडकीस आली आहे.

मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना हिंजवडी परिसरात वेगवेगळ्या बनावट कॉल सेंटर्सची माहिती मिळाली होती. त्यानुसार मा. पोलीस आयुक्तांनी सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट-२ यांना संयुक्त पथके तयार करून या कॉल सेंटर्सवर छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकीरण नाळे यांच्या पथकाने गोपनीय माहितीची खात्री करून हिंजवडी फेज-२ येथे दोन ठिकाणी छापे टाकले.

१. हेल्थ स्कॅम (Medical Health Fraud):

आरोपी अमेरिकन नागरिकांना तेथील वैद्यकीय आरोग्य विभागातून (Medical Health Department) बोलत असल्याचे सांगत असत. ते ‘Round Up’, ‘Zantac’, ‘Talcum Powder’ इत्यादी उत्पादनांचा वापर केल्यामुळे नागरिकांना कॅन्सर, नॉन-हॉचकिंग लिम्फोमा, ब्लड कॅन्सर यांसारखे गंभीर आजार झाल्याचे सांगत. अशा आजारांसाठी भरपाई मिळवून देण्याच्या नावाखाली, लॉ फर्मला माहिती देऊन कमिशनच्या स्वरूपात अमेरिकन नागरिकांकडून डॉलरमध्ये रक्कम उकळत असत.

२. क्रेडिट स्कोअर फ्रॉड (Financial Fraud):

या कॉल सेंटरमधून ‘कम्युनिटी चॉईस फायनान्शियल कंपनीतून’ बोलत असल्याचे सांगून, अमेरिकन नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात होते. त्यांचे क्रेडिट स्कोअर खराब असल्याचे सांगून, तो चांगला करून देण्यासाठी गिफ्ट व्हाऊचर किंवा डॉलरच्या माध्यमातून रक्कम घेतली जात होती. तसेच, त्यांच्या बँक डिटेल्स, यूजर आयडी आणि पासवर्ड इत्यादी संवेदनशील माहिती घेऊन त्यांची फसवणूक केली जात होती.

 

या कारवाईत एकूण २३ जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६/२०२५ आणि ४७/२०२५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्ही कॉल सेंटरचे मालक आणि मॅनेजर्स यांना अटक करण्यात आली आहे.

कॉल सेंटरचे नाव अटक केलेले आरोपी वय (वर्षे)
स्काय हाय सोल्युशन मालक: सागर कुमार यादव ३२
मॅनेजर: आनंद पंकज सिन्हा २९
टेक लॉ सोल्युशन मालक: धनंजय साहेबराव कासार २५
मॅनेजर: हर्षद शंकर खामकर २८

 

छापा कारवाईदरम्यान एकूण २० हार्ड डिस्क, ०३ लॅपटॉप आणि फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रिप्टची पाहणी करण्यात आली. हे कॉल सेंटर अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यावर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या दोन्ही गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रविकीरण नाळे (सायबर पोलीस ठाणे) हे करत असून, अटक केलेल्या आरोपींना दि. १८/११/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड (PCR) मंजूर करण्यात आली आहे. सरकारी वकील श्री. सूरज मोहिते यांनी सरकारी पक्षाकडून मा. न्यायालयात बाजू मांडली.

मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!