news
Home पिंपरी चिंचवड ‘क्रांतीवीरा’च्या जयघोषात पिंपरी दुमदुमले! शौर्याचे प्रबोधन पर्व: लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त शहरात उत्साह

‘क्रांतीवीरा’च्या जयघोषात पिंपरी दुमदुमले! शौर्याचे प्रबोधन पर्व: लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त शहरात उत्साह

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे मुख्य इमारतीत अभिवादन; शाहीर बापू पवार, निलेश देवकुळे, लखन अडागळे यांच्या गीतांनी उपस्थितांना नवी प्रेरणा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

क्रांतीगुुरु लहुजी वस्ताद साळवे यांना महापालिकेचे मानाचे वंदन! ‘क्रांतीवीरा’च्या विचारांचे प्रबोधन पर्व उत्साहात

 

पिंपरी-चिंचवडमध्ये थोर क्रांतीविराच्या जयंतीनिमित्त दुहेरी कार्यक्रम; आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते अभिवादन

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १५ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आज, शुक्रवार (दि. १४ नोव्हेंबर २०२५) रोजी शहरात उत्साहात अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह चिंचवड स्टेशन येथे दोन ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम पार पडले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसदस्य मारुती भापकर, अनुराधा गोरखे, महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संजय ससाणे, नाना कांबळे, गणेश करवले, बाबासाहेब रसाळ, युवराज दाखले, नितीन घोलप, अनिल सव्दडे, हेमंत हरहरे, सूरज कांबळे आदी उपस्थित होते.

चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास तसेच क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसदस्य मारुती भापकर, सुनील कदम, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांसह लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब रसाळ, लहुजी वस्ताद साळवे जयंती समितीचे अध्यक्ष गणेश करवले, जेजुरी देवस्थान समितीचे विश्वस्त अनिल सव्दडे यांसह सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे, संदिपान झोंबाडे, संजय ससाणे, अरुण जोगदंड, युवराज दाखले, सतीश भवाळ, नाना कसबे, सुरेश कांबळे, संजय धुतडमल, मनोज तोरडमल, सुनील भिसे, नितीन घोलप, नाना कांबळे, सविता आव्हाड, अविनाश शिंदे, राजू आवाळे, मयूर जाधव, शिवाजी साळवे, शंकर कावळे, बाळासाहेब खंदारे, बाळू कुचेकर, लहू अडसूळ, अनिल तांबे, रवी पारधे, अनिल कांबळे, महादेव अढागळे, आनंद कांबळे, दादू भवर, नेताजी शिंदे, नाथा शिंदे, चंद्रकांत शिंदे, सुभाष लांडगे, रामा पवार, स्वप्नील मोहिते, विठ्ठल शिंदे, आकाश शिंदे, दीपक भंडारी, पांडुरंग पाटोळे, विलास लांडगे, मनीषा शिंदे, वैशाली जाधव, उषा कांबळे, राधिका अडागळे यांसह जयंती उत्सव समितीचे सदस्य तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंपाशेजारी जागेत केले होते. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते झाले. प्रबोधन पर्वात शाहीर बापू पवार यांचा शाहिरी कार्यक्रम, निलेश देवकुळे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आणि लखन अडागळे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची माहिती गुगल लोकेशनवर उपलब्ध नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून स्मारकाचा उल्लेख गुगल लोकेशनमध्ये करून घेतला. या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सव समितीच्या वतीने आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते महापालिकेचे प्रफुल्ल पुराणिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!