news
Home पिंपरी चिंचवड राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी PCMC कडून सामूहिक संकल्प; राष्ट्रीय एकात्मतेच्या शपथेने इंदिरा गांधींना आदरांजली

राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी PCMC कडून सामूहिक संकल्प; राष्ट्रीय एकात्मतेच्या शपथेने इंदिरा गांधींना आदरांजली

उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे आणि सहाय्यक आयुक्त राजीव घुले उपस्थित; सूत्रसंचालन आणि शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त PCMC मध्ये राष्ट्रीय एकात्मतेची शपथ; ‘हिंसाचाराचा अवलंब करणार नाही’

 

माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांना महापालिकेकडून अभिवादन; अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची प्रमुख उपस्थिती

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे,दि. १९ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वतीने भारताच्या माजी पंतप्रधान आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले. याचवेळी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशाची राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याची सामूहिक शपथ घेतली.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित असलेल्या महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेतली.

या शपथेमध्ये, “आम्ही गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी आम्ही सर्वजण निष्ठापूर्वक काम करू, आम्ही अशीही प्रतिज्ञा करतो की, आम्ही कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही तसेच आम्ही सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू करू” अशी प्रतिज्ञा करण्यात आली.

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त राजीव घुले, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!