news
Home पिंपरी चिंचवड सामाजिक समतेच्या दीपस्तंभाला आदरांजली! पिंपरी-चिंचवड मनपा आणि ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक’ येथे महात्मा फुले स्मृतिदिन साजरा

सामाजिक समतेच्या दीपस्तंभाला आदरांजली! पिंपरी-चिंचवड मनपा आणि ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक’ येथे महात्मा फुले स्मृतिदिन साजरा

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘क्रांतिसूर्य’ महात्मा फुले सामाजिक न्याय व एकात्मतेचे थोर प्रणेते! आयुक्त हर्डीकर यांचे विन्रम अभिवादन

 

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड मनपाकडून आदरांजली

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज (२८ नोव्हेंबर २०२५) त्यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “महात्मा जोतीराव फुले हे सामाजिक एकात्मता आणि न्याय यासाठी आयुष्यभर कार्यरत असणारे थोर समाजसुधारक होते. त्यांच्या कार्यामुळे समाजाला नवी दिशा मिळाली.”

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

याचबरोबर, पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथील महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पोलीस प्रशासनाचे राजेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शंकर लोंढे, ॲड. प्रियंका ढगे (हिबारे), भाई विशाल जाधव, सुजाता विधाते, निर्जरा चौधरी, संतोष माळी, मानव कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!