पुण्यात थरार! गोळीबार करत पळून जाणाऱ्या सराईत चोरट्याला २ पिस्तूलसह अटक; पोलिसांचा थरारक पाठलाग यशस्वी
एकाच आरोपीवर ७० गंभीर गुन्हे दाखल; ८ लाख ८७ हजारांचा ऐवज जप्त; पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २९ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढत असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला विशेष आदेश दिले होते. या आदेशानुसार, पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील सराईत चोरट्यांचा आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा थरारक पाठलाग करत गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तीन आरोपींना जेरबंद केले आहे.
या कारवाईत आरोपींकडून २ देशी बनावटीचे पिस्तूल, ७ जिवंत काडतूस, घातक हत्यार व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ₹८,८७,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक घरफोडी आणि चोरीच्या आरोपींचा शोध घेत होते.
दिनांक २७/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, रावेत पोलीस स्टेशन (गुन्हा रजि. नं ५६९/२०२५ भा.न.सं कलम ३०५,३३१(२)) आणि हिंजवडी पोलीस स्टेशन (गुन्हा रजि. नं ९६९/२०२५) येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सोमाटणे टोलनाक्यावर येणार आहेत.
पहाटे ५:३० च्या सुमारास, मिळालेल्या माहितीनुसार पथक थांबले असताना एका राखाडी रंगाची मारुती सुझुकी सेलेरिओ कार (क्र. एम ए १४ जे ई २६२८) आली. पोलिसांनी कार थांबवण्यास सांगितल्यावर आरोपींनी कार बाहेर काढण्यास सांगितल्यावर आरोपीने त्यांच्या जवळील पिस्तूलने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि स्टाफ यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने राऊंड फायर केला.
यावेळी, पोलीस हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी प्रसंगावधान राखून आरोपीच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपीने केलेला राऊंड कारच्या टपाला लागून आरपार गेला. पोलिसांनी शिताफीने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे व त्यांचा पूर्वेतिहास खालीलप्रमाणे:
-
सनिंसिंग पापसिंग दुधानी, वय २४ वर्षे, रा. गल्ली क्र. ५, श्री साई सोसायटी मागे, शिकलगार वस्ती, बिराजदार नगर, हडपसर, पुणे. (या आरोपीवर यापूर्वी विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे ७० गुन्हे दाखल आहेत).
-
जलमसिंह राजपूतसिंग दुधानी, वय ३२ वर्षे, रा. सव्र्हे नं १०, रामटेकडी, हडपसर, पुणे. (या आरोपीवर एकूण ५० गुन्हे दाखल आहेत).
-
मनीष बाबूलाल कुशवाह, वय २८ वर्षे, रा. गाव पोस्ट कैल्स, तहसिल कैल्स जि. मुरैना राज्य मध्यप्रदेश.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, मा. सह. पोलीस आयुक्त (गुन्हे १) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. २ चे वपोनि अरविंद पवार, उपनिरीक्षक सळोखे, सपोनि गवारे, पोहोवा विक्रम कुदळे, पोहोवा भाऊसाहेब राठोड, पोहोवा तुषार शेटे, पोहोवा विक्रांत चव्हाण, पोहोवा मेहमंद गैसनदाफ, पोहोवा कृष्णन शितोळे, पोशि प्रशांत सैद, पोशि अमर राणे, पोशि सुखदेव गावंडे, पोशि धनंजय जाधव यांनी केली आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
