news
Home पिंपरी चिंचवड संविधान जाणणारे आणि न जाणणारे! बौद्ध समाज विकास महासंघाच्या परिसंवादात संविधानाच्या प्रास्ताविकेचे (Preamble) वाचन

संविधान जाणणारे आणि न जाणणारे! बौद्ध समाज विकास महासंघाच्या परिसंवादात संविधानाच्या प्रास्ताविकेचे (Preamble) वाचन

भाऊसाहेब डोळस यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम; मानव कांबळे, नरेंद्र बनसोडे, विनोद गायकवाड यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जागतिक लिंगायत महासभा आदी संघटनांचा सहभाग. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मतदान यादीतील नाव म्हणजे, ‘भारत देशाच्या ७/१२’ वर नाव असणे: संविधान सुलभक नुरखाँ पठाण

 

पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात संविधान दिनानिमित्त परिसंवाद; ‘संविधान मानणारे नव्हे, तर जाणणारे महत्त्वाचे’

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ३० नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

संविधान दिनानिमित्त बौद्ध समाज विकास महासंघ आयोजित केलेल्या एका महत्त्वपूर्ण परिसंवादात, संविधान सुलभक नुरखाँ पठाण यांनी अत्यंत मार्मिक प्रतिपादन केले. पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये आयोजित या परिसंवादात बोलताना, नुरखाँ पठाण म्हणाले की, “मतदान यादीत नाव असणे म्हणजे, भारत देशाच्या ७/१२ वर नाव असणे होय.”

नुरखाँ पठाण यांनी आपल्या भाषणात संविधानाचे ज्ञान असण्यावर विशेष जोर दिला. ते म्हणाले, “संविधान मानणारे व न मानणारे महत्त्वाचे नसून, संविधान जाणणारे व न जाणणारे महत्त्वाचे आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. नामदेव वाळके यांनी भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे (Preamble) वाचन करून केली. विजय गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब डोळस हे होते. परिसंवादानंतर नागरिकांनी संविधानावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नुरखाँ पठाण यांनी दिली.

या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिसंवादासाठी मानव कांबळे, नरेंद्र बनसोडे, प्रकाश डोळस, विनोद गायकवाड, प्रदीप पवार  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • सर्व बुद्ध विहारे, संविधान सजगता मंच, मराठा सेवा संघ, भाजी ब्रिगेड, बसवेश्वर संघ, जागतिक लिंगायत महासभा – पुणे, रा बलुतेदार संघटना, संत रोहीदास संघटना, बारा बलुतेदार संघटना, रयत विद्धार्थी मंचया संघटनांनी परिसंवादात सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अनिल सूर्यवंशी, शरद जाधव, रवींद्र दुधेकर, वसंत साळवी, संजय बनसोडे, शरद जाधव, मिलिंद घोगरे आणि विशाल कांबळे इत्यादींनी परिश्रम घेतले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!