news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड ‘आमदार विरुद्ध कार्यकर्ता’! सचिन काळभोर यांची उमेदवारी रोखण्यासाठी महेश लांडगे यांचा उच्चस्तरीय राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न

‘आमदार विरुद्ध कार्यकर्ता’! सचिन काळभोर यांची उमेदवारी रोखण्यासाठी महेश लांडगे यांचा उच्चस्तरीय राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न

पी.सी.एम.सी. कॉलनीतील धोकादायक इमारती, आ॑ण्णा भाऊ साठे वसाहतीतील मूलभूत सुविधा आणि ९२० घरकुल लाभार्थ्यांना घरे न मिळाल्याच्या प्रश्नांवरून संघर्ष अधिक तीव्र. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भोसरीत भाजपमधील गृहकलह शिगेला! आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात निष्ठावंत सचिन काळभोर यांचा नागरी प्रश्नांवरून थेट संघर्ष

 

निगडीतील धोकादायक इमारती, घरकुल वाटप आणि भाजी मंडईच्या मुद्द्यांवरून ‘लांडगे विरुद्ध काळभोर’ वाद विकोपाला; उमेदवारी रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी (भाजप) अंतर्गत मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्यातील जुना वाद आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता उघड संघर्षात बदलला आहे. ‘आमदार विरुद्ध कार्यकर्ता’ अशी थेट लढाई समोर आल्याने भोसरीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

सचिन काळभोर हे अनेक वर्षांपासून निगडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सक्रिय आहेत. ते विविध नागरी समस्यांवर आक्रमक भूमिका घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या याच सक्रिय भूमिकेमुळे त्यांच्यात आणि आमदार महेश लांडगे यांच्यात वाद निर्माण झाले.

 या वादातूनच, चिखली येथील टाऊनहॉलच्या उद्घाटनप्रसंगी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, आमदार महेश लांडगे यांनी सचिन काळभोर यांना जीवाची धमकी दिल्याचा गंभीर आरोप झाला होता. निगडी सेक्टर २२ येथील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल इमारतींच्या लाभार्थ्यांना घरे वितरित करण्याच्या सचिन काळभोर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा वाद विकोपाला गेला होता.

सचिन काळभोर यांनी पक्षांतर्गतही आमदार महेश लांडगे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवले होते:

  • प्रोटोकॉलचा भंग: भाजप शहर माजीाध्यक्ष शंकर जगताप यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रमांमध्ये त्यांचे आणि आमदारांचे फोटो वापरले जात नसल्याची लेखी तक्रार सचिन काळभोर यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली होती.

  • उमेदवारी विरोधाची मागणी: सचिन काळभोर यांनी भोसरी विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे आदी वरिष्ठ नेत्यांकडे केली होती.

तरीही पक्षाने आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला. या काळात सचिन काळभोर यांना शहर कार्यकारिणीतही बाजूला सारल्याचे आरोप झाले.

सचिन काळभोर यांनी प्रभाग क्रमांक १३ आणि निगडी परिसरातील अनेक ज्वलंत नागरी प्रश्नांवर आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले आहेत:

  • पी.सी.एम.सी. कॉलनीतील धोकादायक इमारती: ९ इमारतींमधील ५७६ सदनिका अत्यंत जीर्ण असून, नागरिकांना स्थलांतराची आवश्यकता असतानाही आमदारांनी ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे.

  • आण्णा भाऊ साठे वसाहत: येथील २५६ लाभार्थ्यांना गटारे, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी इत्यादी मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा मुद्दा सचिन काळभोर यांनी वारंवार उपस्थित केला आहे.

  • सेक्टर २२ – जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना: १४-१५ वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण होऊनही ९२० पात्र लाभार्थ्यांना घरे मिळाली नसताना आमदारांनी दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

  • काळभोर गोटा – भाजी मंडई गाळे वाटप: महापालिकेने बांधलेल्या भाजी मंडईचे गाळे वाटप आमदार महेश लांडगे यांनी अडवून ठेवल्यामुळे मंडई उपयोगात न येता रिकामी पडून आहे, असा थेट आरोप सचिन काळभोर समर्थकांनी केला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक १३ मधून सचिन काळभोर यांना भाजपची उमेदवारी मिळू नये, यासाठी आमदार महेश लांडगे प्रयत्न करत असल्याचा आरोप सचिन काळभोर यांच्या समर्थकांनी केला आहे. आमदार महेश लांडगे हे उच्चस्तरीय राजकीय वजन वापरून सचिन काळभोर यांची उमेदवारी रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात “लांडगे विरुद्ध काळभोर” असा सत्ता संघर्ष खुलेपणाने समोर आला असून, पुढील निवडणुकीत या संघर्षाचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!