news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home मुख्यपृष्ठ सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई उच्च न्यायालयात २३३० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई उच्च न्यायालयात २३३० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

५ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत; मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर खंडपीठांत नियुक्तीची संधी, पहा पात्रता आणि वेतनश्रेणी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२५: २३३० पदांसाठी मेगा भरती जाहीर!

 

 

लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर पदांसाठी ७ वी पास ते पदवीधरांना मोठी संधी

मुंबई प्रतिनिधी, दि.१७ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

मुंबई उच्च न्यायालयाने (High Court of Judicature at Bombay) आपल्या मुंबई मुख्य खंडपीठ, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठांसाठी तब्बल २३३० पदांची महाभरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेला १५ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली असून, इच्छुक उमेदवारांना ५ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.


पदनाम (Post Name) मुंबई नागपूर संभाजीनगर एकूण पदे
लिपिक (Clerk) ८३० १६६ ३३६ १३३२
शिपाई / हमाल (Peon) ५७० ११५ २०२ ८८७
स्टेनो (Lower Grade) ४४ ०४ ०८ ५६
स्टेनो (Higher Grade) ०९ ०२ ०८ १९
ड्रायव्हर (Driver) २६ ०४ ०६ ३६
एकूण १४७९ २९१ ५६० २३३०

पद शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा (खुला प्रवर्ग)
लिपिक पदवीधर + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. + MS-CIT १८ ते ३८ वर्षे
शिपाई / हमाल किमान ७ वी उत्तीर्ण १८ ते ३८ वर्षे
स्टेनोग्राफर पदवीधर + शॉर्टहँड (८०/१०० श.प्र.मि.) + टायपिंग ४० श.प्र.मि. २१ ते ३८ वर्षे
ड्रायव्हर १० वी उत्तीर्ण + LMV लायसन्स + ३ वर्षांचा अनुभव २१ ते ३८ वर्षे

(टीप: राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत शिथिलता म्हणजेच ४३ वर्षांपर्यंत सवलत आहे.)


  • स्टेनोग्राफर (Higher): ₹५६,१०० – ₹१,७७,५०० (S-20)

  • लिपिक / ड्रायव्हर: ₹२९,२०० – ₹९२,३०० (S-10)

  • शिपाई / हमाल: ₹१६,६०० – ₹५२,४०० (S-3)


  • लिपिक: ९० गुणांची लेखी परीक्षा (मराठी, इंग्रजी, GK, गणित, संगणक) + २० गुणांची टायपिंग चाचणी + ४० गुणांची मुलाखत.

  • शिपाई: ३० गुणांची लेखी परीक्षा + १० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी + १० गुणांची मुलाखत.

  • ड्रायव्हर: २० गुणांची लेखी परीक्षा + १० गुणांची ड्रायव्हिंग टेस्ट + १० गुणांची मुलाखत.


१. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर bombayhighcourt.nic.in भेट द्या.

२. प्रथम SBI Collect द्वारे ₹१,०००/- फी भरून त्याचा संदर्भ क्रमांक (Reference Number) मिळवा.

३. ‘Apply Online’ वर क्लिक करून वैयक्तिक माहिती भरा आणि फोटो/स्वाक्षरी अपलोड करा.

४. अर्जाची प्रिंट काढून आपल्याकडे जतन करून ठेवा.


  • अर्ज भरण्यास सुरुवात: १५ डिसेंबर २०२५ (सकाळी ११:०० वा.)

  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ०५ जानेवारी २०२६ (संध्याकाळी ५:०० वा.)

  • परीक्षा शुल्क: ₹१,०००/- (सर्व प्रवर्गासाठी)

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!