news
Home पिंपरी चिंचवड “तुमच्या सेवेचा शहराला अभिमान!” मनपाच्या विविध विभागांतील अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निवृत्ती सोहळा संपन्न

“तुमच्या सेवेचा शहराला अभिमान!” मनपाच्या विविध विभागांतील अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निवृत्ती सोहळा संपन्न

जानेवारी अखेर ३३ कर्मचाऱ्यांची नियत वयोमानानुसार निवृत्ती, तर ५ जणांची स्वेच्छानिवृत्ती; महापालिका प्रशासनाकडून कृतज्ञता व्यक्त. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून ३८ कर्मचारी सेवानिवृत्त; प्रामाणिक सेवेबद्दल प्रशासनाकडून गौरव


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ३१ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांत प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले एकूण ३८ अधिकारी व कर्मचारी माहे जानेवारी २०२६ अखेर सेवानिवृत्त झाले आहेत. यामध्ये नियत वयोमानानुसार ३३ कर्मचारी निवृत्त झाले, तर ५ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्याची माहिती मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिली.

जानेवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खालील नावांचा समावेश आहे:

  • अधिकारी व तांत्रिक वर्ग: उप अभियंता राजेश जगताप, असिस्टंट मेट्रन सुवर्णलता भोसले व जेनीफर शेफर्ड, गटनिदेशक राजकुमार तिकोने, कार्यालय अधीक्षक किशोर काटे व चंद्रकांत विरणक.

  • आरोग्य व शिक्षण विभाग: सिस्टर इन्चार्ज सरिता कुलकर्णी व रत्नमाला जगताप, ए.एन.एम. मानसी पुणतांबेकर, उपशिक्षक पुष्पलता धोकटे.

  • इतर कर्मचारी: इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर अनंत उदुगडे, वायरलेस ऑपरेटर दिलीप औटी, मुकादम पुखराज रेनवा, सुरक्षा सुपरवायझर रामचंद्र वाजे, रखवालदार भालचंद्र भोसले व विलास गजरमल.

  • सेवक वर्ग: मजूर काशिनाथ लांडे, आनंद जाधव, सुरेश किंद्रे, ज्ञानेश्वर बालवडकर, विलास लांडे, जानार्दन कदम, गणेश गव्हाणे, शिपाई राजू शिंदे, गायत्री जाधव, ज्ञानेश्वर भरेकर, देवीदास जगताप.

  • स्वच्छता विभाग: सफाई कामगार रत्नाबाई धोत्रे, सुमन सावंत, अनिता माछरे, राजेश टकले, विलास सिताराम गाडे आणि सफाई सेवक अशोक शेट्टी.

अटेंडंट मदतनीस संतोष गायकवाड, मुकादम प्रमोद अंदे, सफाई कामगार पवित्रा भागवत, सत्यवान वाळके आणि गटरकुली हणुमंता मुठे या पाच कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करताना महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक म्हणाले की, “सेवानिवृत्त होत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, कार्यालयीन शिस्त आणि जबाबदारीची जाण ठेवून नागरिकाभिमुख सेवा दिली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि योगदानाचा महापालिकेच्या कामकाजावर सकारात्मक ठसा उमटलेला असून, निवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.”

शहराच्या जडणघडणीत या सर्व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा राहिला असून, महापालिका प्रशासनाच्या वतीने त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!