news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड “राजासारखं मन असणारा राजा माणूस गमावला”; प्रशांत जगताप यांनी वाहिली अजितदादांना भावूक श्रद्धांजली

“राजासारखं मन असणारा राजा माणूस गमावला”; प्रशांत जगताप यांनी वाहिली अजितदादांना भावूक श्रद्धांजली

२४ वर्षांच्या प्रवासातील 'ती' माया आणि बापासारखी काळजी; राजकीय वाटा वेगळ्या होऊनही दादांनी जपला माणुसकीचा ओलावा. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अजितदादा: करारी नेतृत्वामागे दडलेला एक हळवा ‘माणूस’! प्रशांत जगताप यांनी जागवल्या ‘दादां’च्या आठवणी


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी/बारामती : "महाराष्ट्राचे लाडके 'दादा' आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाचा धक्का अजूनही मन मानायला तयार नाही. ज्या ठिकाणी दादांना मुखाग्नी देण्यात आला, तिथे पुन्हा एकदा नतमस्तक होताना त्यांच्यासोबतच्या २४ वर्षांच्या प्रवासातील अनेक आठवणी दाटून आल्या," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रशांत जगताप यांनी तब्बल २४ वर्षे अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केले. २ जुलै २०२३ रोजी जेव्हा राजकीय वाटा वेगळ्या झाल्या, तेव्हा जगताप यांनी वैचारिक निष्ठेपोटी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, या काळातही दादांनी कधीही मनात आकस ठेवला नाही. “मी सोबत नाही म्हणून दादांनी कधीही माझ्यावर टीका केली नाही, उलट पुणे महापालिका निवडणुकीत माझ्या विरोधात उमेदवार न देता माझ्या कामाचा सन्मानच केला. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता,” असे जगताप यांनी नमूद केले.

प्रशांत जगताप यांनी दादांच्या हळव्या स्वभावाचे दोन हृदयस्पर्शी प्रसंग आवर्जून सांगितले:

  • आजारी असताना धावून आले दादा: जून २०२२ मध्ये जेव्हा प्रशांत जगताप यांना ‘फेस पॅरालाईसिस’ झाला, तेव्हा दादांनी रात्री ११:३० वाजता कॉल करून त्यांना बोल सुनावले. “हे तू माझ्यापासून का लपवलंस?” असा अधिकारवाणीने प्रश्न विचारत दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना मुंबईला बोलावून घेतले. स्वतःच्या फॅमिली डॉक्टरला फोन लावून, “प्रशांत माझा घरातला माणूस आहे, त्याला काहीही करून बरं करा,” असा शब्द त्यांनी दिला.

  • रॅलीतील तो ‘प्रशांत आत्ताच्या आत्ता जीपवर ये’चा आदेश: पोटनिवडणुकीच्या रॅलीत ट्रॅफिक सोडवण्यासाठी जगताप जीपच्या समोर पळत होते. हे पाहून दादा चिडले आणि त्यांनी जीप थांबवून जगतापांना वर बोलावले. “अरे बाळा, तुझ्यावर उपचार सुरू आहेत आणि तू असा २-३ किलोमीटर पळतोय,” असे म्हणत दादांनी त्यांची एका पालकाप्रमाणे काळजी व्यक्त केली.

राजकीय वाटा वेगळ्या झाल्यानंतरही दादांनी कधीही वैयक्तिक नात्यात कटुता येऊ दिली नाही. जगताप यांनी जेव्हा मेसेज करून आपण सोबत येऊ शकणार नाही असे सांगितले, तेव्हाही दादांनी १३ मिनिटे फोनवर अत्यंत प्रेमाने संवाद साधला. “राजासारखं मन असणारा राजा माणूस महाराष्ट्राने गमावला आहे,” अशा शब्दांत जगताप यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.

प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलेल्या या भावनांमधून अजितदादांच्या कडक शिस्तीमागे दडलेला मायेचा पाझर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आला आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!