news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड संतांच्या समतावादी विचारांचा वारसा जोपासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेत संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

संतांच्या समतावादी विचारांचा वारसा जोपासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेत संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

"मन चंगा, तो कटौती मे गंगा" चा संदेश देणाऱ्या संत शिरोमणींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण; उपायुक्त अण्णा बोदडे यांनी व्यक्त केले विचार. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संत रविदास महाराजांचे विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवणे काळाची गरज; महापालिकेत जयंतीनिमित्त अभिवादन


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “संत रविदास हे थोर संत, कवी तसेच सामाजिक एकात्मतेसाठी सतत कार्यरत असणारे थोर समाजसुधारक होते. ‘मन चंगा, तो कटौती मे गंगा’ यांसारख्या दोह्यांतून त्यांनी सकारात्मक जीवन जगण्याचा आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे,” असे प्रतिपादन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:

बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सुनील कदम, नंदकुमार कांबळे, डॉ. धनंजय भिसे, गणपत भाग्यवंत, दत्तात्रय कांबळे, मारुती वाघमारे, हरीश वाघमारे, जालिंदर थोरात, प्रभाकर कदम, चंद्रकांत म्हस्के, रामेश्वर पाचारे, बळीराम वाघमारे, दत्तात्रय सोनवणे, अशोक शेळके, मारुती सोनवणे, सूरज पाखरे, राजहंस पाचंगे, किरण सोनवणे, भगवान वाघमारे, ॲड. सूरज खाडे, संतोष वाघमारे, गोरोबा गुजर आणि दत्तात्रय शिंदे यांचा समावेश होता.

संत रविदास महाराज यांनी महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये भ्रमंती करून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. या कार्यक्रमाला महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी संत रविदास महाराजांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!