news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड मॅरेथॉन आढावा बैठक आणि प्रत्यक्ष पाहणी! विकासकामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्याने अधिकाऱ्यांची धावपळ

मॅरेथॉन आढावा बैठक आणि प्रत्यक्ष पाहणी! विकासकामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्याने अधिकाऱ्यांची धावपळ

पाणी, ड्रेनेज आणि पथदिव्यांच्या समस्या सोडवण्यासाठी 'डेडलाईन'; नागरिकांना दिलेल्या शब्दासाठी नगरसेवक मैदानात. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

प्रभाग २८ मध्ये विकासकामांसाठी नगरसेवक ‘ॲक्शन मोड’वर; बापू काटेंनी पालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर-रहाटणी) चे लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. विकासकामांमध्ये होणारी दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा देत नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका सौ. अनिताताई काटे आणि नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे यांनी पालिका यंत्रणेला थेट धारेवर धरले.

प्रभागातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी तिन्ही नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन आढावा बैठक घेतली. केवळ चर्चाच नाही, तर कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत कामाचा दर्जा आणि प्रगतीचा अहवाल मागवला. यावेळी कामातील विलंब आणि गुणवत्तेबाबत काही त्रुटी आढळल्याने नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले.

बैठकीत नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित असलेल्या खालील विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला:

  • पाणीपुरवठा व ड्रेनेज: अपूर्ण असलेल्या ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठ्यातील अडचणी तातडीने दूर करणे.

  • विद्युत व पथदिवे: प्रभागातील स्ट्रीट लाईट्सची देखभाल आणि नवीन दिवे बसवणे.

  • आरोग्य व उद्याने: सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कामे आणि उद्यानांची नियमित देखभाल-दुरुस्ती.

  • रस्ते दुरुस्ती: प्रलंबित रस्त्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश.

“नागरिकांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. विकासकामांत कंत्राटदार किंवा अधिकाऱ्यांकडून होणारी कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,” असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास तातडीने थांबवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

या पाहणी दौऱ्यास पालिकेचे संबंधित विभागांचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली असून, प्रलंबित कामांना आता वेग मिळण्याची शक्यता आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!