news
Home अकोला “महाराष्ट्राने लोकनेता गमावला”; पत्रकार परिषदेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण

“महाराष्ट्राने लोकनेता गमावला”; पत्रकार परिषदेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण

मूर्तीजापूर-दर्यापूर तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती; लक्षेश्वर वारकरी सांप्रदायिक मंडळाकडून वारकरी सप्ताहाचे नियोजन. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

लाखपुरी येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचा जयघोष; लक्षेश्वर संस्थान व पत्रकारांनी वाहिली अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, ३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

लाखपुरी : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे आगामी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या नियोजनासाठी सोमवारी (२ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उत्सवाच्या रूपरेषेसोबतच, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तीर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थान आणि उपस्थित पत्रकारांच्या वतीने अत्यंत भावूक वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त १० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कीर्तन सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. लक्षेश्वर वारकरी सांप्रदायिक मंडळ, प्रार्थना मंडळ, आरती मंडळ आणि भजन मंडळांनी या स्नेहभोजन व पत्रकार परिषदेचे नेटके आयोजन केले होते.

पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पत्रकार प्रा. दीपक जोशी, प्रा. अविनाश बेलाडकर आणि विलास नसले यांनी लक्षेश्वर संस्थानच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला. या ठिकाणी नागबली पूजन, कालसर्प शांती यांसारख्या विधिवत पूजा केल्या जातात. संस्थानमधील प्रत्येक मूर्तीचे महत्त्व आणि सुरू असलेल्या सामाजिक व धार्मिक कार्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या बैठकीस मूर्तीजापूर आणि दर्यापूर तालुक्यातील पत्रकार  संजय उमक, गौरव अग्रवाल, मिलिंद जामनिक, रोहित सोळके, गजानन गवई, अजय प्रभे, मच्छिद्र भटकर, सुमित सोनोने, योगेश आगाशे, विलास सावळे, श्याम वाळस्कर, प्रकाश श्रीवास, आकाश जामनिक आणि अतुल नवघरे उपस्थित होते.

संस्थानचे अध्यक्ष राजू दहापुते, त्रिलोक पंचारिया, सरपंच राजप्रसाद कैथवास, दत्ता गव्हाळे, अरुण अरोरा, दत्ता नाचणे, सचिन तामसे, लक्ष्मीकांत शर्मा, सुनील हरणे, महादेवराव ढाकरे, संतोष जोगी, गुलाबराव अवघड, अक्षय अवघड, प्रवीण सुरजुसे यांच्यासह अनेक सेवाधारी व भक्तगण उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन अध्यक्ष राजू दहापुते यांनी केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!