news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home अमरावती विदर्भाच्या विकासासाठी अजितदादांनी दिले होते बळ! विमानतळाच्या नामकरणासाठी अमरावतीतून आग्रही मागणी

विदर्भाच्या विकासासाठी अजितदादांनी दिले होते बळ! विमानतळाच्या नामकरणासाठी अमरावतीतून आग्रही मागणी

बेलोरा विमानतळाच्या उभारणीतील 'दादां'च्या योगदानाचा सन्मान करण्याची विनंती; केंद्र व राज्य सरकारला ई-मेलद्वारे पाठविले साकडे. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अमरावती विमानतळाला ‘अजितदादा पवार’ यांचे नाव द्या; लोकभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कार्यान्वित झालेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळास राज्याचे लाडके नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अमरावती अखबारचे संपादक ऋषिकेश शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून ही आग्रही मागणी केली आहे.

अमरावती विमानतळाच्या उभारणीत आणि या प्रकल्पाला गती देण्यात स्व. अजितदादा पवार यांचा मोलाचा वाटा होता. विशेष म्हणजे, या विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी ते स्वतः उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, विशेषतः विदर्भातील प्रकल्पांसाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यांच्या याच योगदानाचा आणि ऋणांचा सन्मान म्हणून हे नामकरण व्हावे, अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

ऋषिकेश शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापु आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अजितदादांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचे नेतृत्व गमावले आहे. पश्चिम विदर्भातील जनतेच्या मनात त्यांच्याविषयी मोठी कृतज्ञता आहे. त्यामुळे ‘अजितदादा पवार विमानतळ’ असे नाव देणे हा त्यांच्या कार्याचा योग्य गौरव ठरेल.”

अमरावतीच्या विकासासाठी अजितदादांनी घेतलेले निर्णय आणि दिलेला निधी यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला. जनभावना लक्षात घेऊन राज्य आणि केंद्र सरकारने या नामकरणाबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती जिल्ह्यातील विविध स्तरांतून केली जात आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!