news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड ‘खुनाचा प्रयत्न’ करणारा सराईत गुन्हेगार आता गजाआड! देहूरोड पोलिसांकडून ५ मोटारसायकली आणि १ रिक्षा जप्त

‘खुनाचा प्रयत्न’ करणारा सराईत गुन्हेगार आता गजाआड! देहूरोड पोलिसांकडून ५ मोटारसायकली आणि १ रिक्षा जप्त

विना नंबर प्लेटची दुचाकी फिरवणे पडले महागात; संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी आवळल्या मुसक्या, देहूगाव परिसरातून टोळीचा पर्दाफाश. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

देहूरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद, ६ गुन्हे उघडकीस करून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, (३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

देहूरोड : पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी देहूरोड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून वाहन चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ०६ गुन्हे उघडकीस आणले असून एकूण ५ लाख रुपये किमतीच्या ०६ मोटार सायकली आणि ०१ रिक्षा जप्त केली आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड तपास पथकाची दोन पथके गस्त घालत होती. २७ जानेवारी रोजी देहूगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना, विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन जाणारा ईश्वर संदीप गजे (वय २२, सध्या रा. खालुब्रे, खेड) हा संशयास्पदरित्या आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपी ईश्वर गजे याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने त्याचे साथीदार अनिकेत उर्फ छोट्या संतोष विटकर (वय २०, रा. देहूगाव) आणि आर्यन उर्फ एस.पी. आनंदा राऊत (वय १९, रा. मोशी) यांची नावे सांगितली. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देहूरोड, दिघी, सिंहगड रोड आणि खडक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.

  • अनिकेत उर्फ छोट्या विटकर: याच्यावर यापूर्वी देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) आणि आर्म ॲक्टसह गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • आर्यन उर्फ एस.पी. राऊत: याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, लखनकुमार वाव्हळे, अंमलदार किरण खेडकर, बाळासाहेब विधाते, सुरेश ढवळे, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, युवराज माने, शुभम बावनकर, अमोल माने आणि मोमीन शेख यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.

शहरातील वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आता कडक पावले उचलली जात आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!