news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home पिंपरी चिंचवड “जालन्यात फिल्मी स्टाईल अटक!” पल्सर टोळीचे जाळे काळेवाडी पोलिसांनी उखडले; सोन्याच्या दागिन्यांसह ७ मोटारसायकल जप्त

“जालन्यात फिल्मी स्टाईल अटक!” पल्सर टोळीचे जाळे काळेवाडी पोलिसांनी उखडले; सोन्याच्या दागिन्यांसह ७ मोटारसायकल जप्त

तांत्रिक तपासाच्या जोरावर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या; खंजर आणि मोबाईलसह ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, पोलीस आयुक्तांकडून तपास पथकाचे कौतुक. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

काळेवाडी पोलिसांची मोठी कारवाई! चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला जालन्यातून ठोकल्या बेड्या; ७ दुचाकींसह ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : काळेवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि सोनसाखळी चोरीसह दुचाकी पळवणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात काळेवाडी पोलिसांना यश आले आहे. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे थेट जालना जिल्ह्यातील एका खेडेगावातून आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ६ लाख ५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गुरव आणि त्यांच्या पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवली. आरोपी जालन्यात लपून बसल्याची खात्री पटताच, पथकाने तिथे जाऊन सापळा लावला आणि आरोपींना पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

आरोपींकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात काळेवाडी पोलीस ठाण्यातील ७ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:

  • दागिने: २१.५३० ग्रॅम वजनाचे ३ लाख ७९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र.

  • वाहने: २ लाख २० हजार रुपये किमतीच्या ५ बजाज पल्सर आणि ४५ हजार रुपये किमतीच्या २ स्प्लेंडर अशा एकूण ७ मोटारसायकल.

  • इतर: ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हॅण्डसेट आणि गुन्ह्यात वापरलेला ५०० रुपयांचा खंजर.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेंद्र धुमाळे, सपोनि वैभव गुरव, श्रेणी फौजदार राजेंद्र काळे, स्वप्निल खेतले, प्रमोद कदम, अतिक शेख, अशोक जायभाये, भारत पारधी, विजय मोरे, अजय फल्ले, रमेश खेडकर, रमेश ब्राह्मण, भास्कर भारती आणि मंगेश लोखंडे यांचा समावेश होता.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!