news
Home पिंपरी चिंचवड “समाजसुधारणेसाठी लेखणीचा प्रभावी वापर!” बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड मनपाचा मानाचा मुजरा

“समाजसुधारणेसाठी लेखणीचा प्रभावी वापर!” बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड मनपाचा मानाचा मुजरा

मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या जनकाचा महापालिकेत जागर; 'दर्पण'च्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य अजरामर, महापौर, अतिरिक्त आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर हे सत्यनिष्ठ पत्रकारितेचे आद्य प्रणेते! पिंपरी-चिंचवड मनपात जयंती उत्साहात साजरी; महापौर रवि लांडगे यांनी अर्पण केले अभिवादन

 


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २१ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “मराठी भाषेतून समाजजागृती, विवेकशील विचार आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेची सुरुवात करणारे ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारितेचे आद्य प्रणेते होते. अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या जांभेकर यांनी १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून महाराष्ट्राच्या वैचारिक क्रांतीचा नवा अध्याय सुरू केला,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या अभिवादन सोहळ्याप्रसंगी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये:

  • विक्रांत बगाडे (अतिरिक्त आयुक्त)

  • किरणराज यादव (स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी)

  • अण्णा बोदडे (उपायुक्त)

  • किरण गायकवाड (विशेष अधिकारी)

  • अतुल पाटीलअजिंक्य येळे (क्षेत्रीय अधिकारी)

  • प्रफुल्ल पुराणिक (जनता संपर्क अधिकारी)

    यांचा समावेश होता.

बाळशास्त्री जांभेकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाज सुधारणेसाठी लेखणीचा वापर केला. त्यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ वृत्तपत्रामुळेच मराठी माणसाला जगातील घडामोडी समजण्यास मदत झाली. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी रुढी-परंपरांच्या विरोधात आवाज उठवून समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या याच महान कार्याचे स्मरण आज महापालिकेत करण्यात आले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!