news
Home पिंपरी चिंचवड “रहिवाशांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे मोठे समाधान!” बापू काटे यांच्या हस्ते काँक्रिटीकरण कामाचा शानदार शुभारंभ; अनिताताई काटे आणि कुंदाताई भिसे यांच्या उपस्थितीत सोसायट्यांचा ‘डेडलॉक’ सुटला

“रहिवाशांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे मोठे समाधान!” बापू काटे यांच्या हस्ते काँक्रिटीकरण कामाचा शानदार शुभारंभ; अनिताताई काटे आणि कुंदाताई भिसे यांच्या उपस्थितीत सोसायट्यांचा ‘डेडलॉक’ सुटला

वाहतुकीचा सर्वात मोठा अडथळा अखेर दूर! जमीन अधिग्रहण आणि तांत्रिक कचाट्यातून '१८ मीटर' रस्त्याचा मार्ग मोकळा; नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश. (@ २०२६ | मॅक्स मंथन विशेष)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


पिंपळे सौदागरचा वनवास संपला! अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्त्याचे काम अखेर सुरू; बापू काटे यांच्या ‘शब्दा’ला जागले प्रशासन


पिंपळे सौदागर प्रतिनिधी: बालाजी नवले, २० मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:

पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीचा सर्वात मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. तांत्रिक अडचणी आणि जमीन अधिग्रहणाच्या कचाट्यात अनेक वर्षांपासून अडकलेल्या १८ मीटर ‘ट्रायोज ते झूलेलाल टॉवर’ या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा मार्ग मोकळा झाला असून, प्रत्यक्ष कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली.

नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिताताई काटे आणि नगरसेविका कुंदाताई भिसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या ‘डेडलॉक’ झालेल्या प्रकल्पाला गती मिळाली आहे.

पिंपळे सौदागरच्या मध्यवर्ती भागातून जाणारा हा रस्ता अनेक मोठ्या गृहप्रकल्पांना जोडणारा मुख्य दुवा आहे. मात्र:

  • जमिनीचे अधिग्रहण (Land Acquisition) रखडलेले होते.

  • प्रशासकीय पातळीवर काही तांत्रिक त्रुटी होत्या.

  • रस्ता अर्धवट असल्याने नागरिकांना प्रचंड धूळ आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

बापू काटे यांनी महापालिका प्रशासनासोबत वारंवार बैठका घेऊन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तांत्रिक बाजू मांडून सर्व कायदेशीर अडथळे दूर केले.

कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “निवडणुकीच्या वेळी ट्रायोज आणि झूलेलाल टॉवरच्या रहिवाशांना दिलेला शब्द आज पूर्ण होताना पाहून मोठे समाधान वाटत आहे. हा रस्ता या भागाची ‘लाईफलाईन’ आहे. अनेक अडचणी आल्या, पण आम्ही कच खाल्ली नाही. आता हा रस्ता दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करून लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल करू.”

रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे स्थानिक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धुळीचा त्रास सहन करणाऱ्या गृहिणी आणि वाहनचालकांनी भाजप लोकप्रतिनिधींच्या राजकीय इच्छाशक्तीचे कौतुक केले. याप्रसंगी उद्योजक संदिपशेठ काटे, संजयशेठ भिसे, धनंजयशेठ भिसे यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!