news
Home अमरावती जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी पात्र युवक-युवतींकडून प्रस्ताव आमंत्रित; ८ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी पात्र युवक-युवतींकडून प्रस्ताव आमंत्रित; ८ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांची माहिती; उत्कृष्ट कार्यासाठी युवक-युवतींना १० हजार तर संस्थांना ५० हजारांचे बक्षीस @२०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन; ८ एप्रिलपर्यंत अर्जांची मुदत

 

 

 

अमरावती प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ३१ मार्च २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: महाराष्ट्र राज्य युवा धोरणानुसार सन २०२५-२६ या वर्षाकरिता जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी पात्र युवक-युवती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जाणार असून, इच्छुकांनी ८ एप्रिल २०२६ पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

  • युवक व युवती: प्रत्येकी १० हजार रुपये रोख, गौरव पत्र आणि सन्मानचिन्ह.

  • उत्कृष्ट संस्था: ५० हजार रुपये रोख, गौरव पत्र आणि सन्मानचिन्ह (नोंदणीकृत संस्थेसाठी).

१. वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या युवक-युवतींचे वय १ एप्रिल रोजी १५ वर्षे पूर्ण, तर ३१ मार्च रोजी २९ वर्षांपर्यंत असावे.

२. वास्तव्य: अर्जदार जिल्ह्यात सलग पाच वर्षांपासून वास्तव्यास असणे अनिवार्य आहे.

३. संस्था नोंदणी: संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टनुसार नोंदणीकृत असावी आणि किमान पाच वर्षे कार्यरत असावी.

४. कार्याचा पुरावा: अर्जदारांनी मागील तीन वर्षांतील कार्याचे पुरावे (वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, फोटो व व्हिडिओ) अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

५. सक्रियता: पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुढील किमान दोन वर्षे सक्रिय राहण्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे.

शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, तसेच विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत.

अधिक माहिती आणि अर्जाच्या नमुन्यासाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड, तपोवन गेटजवळ, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!