news
लुटियन्स दिल्लीतील ‘उच्चभ्रूंचा’ अड्डा बंद! साम्राज्यवादी मानसिकतेच्या ‘दिल्ली जिमखाना क्लब’वर मोदी सरकारचा हातोडाप्रशासनाचा पाठीचा कणा असलेल्या महसूल यंत्रणेला अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडक ताकीद! आठवड्यातून एक दिवस गावपातळीवर तपासणी बंधनकारकपिंपरी-चिंचवड शहर १५ दिवस हाय अलर्टवर! पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकरांकडून जमावबंदीचे कडक आदेश जारी“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन‘एआय फॉर सायन्स’च्या नव्या सुवर्णयुगाची नांदी! जगप्रसिद्ध ‘डॅडलस’ नियतकालिकात ३३ जागतिक वैज्ञानिकांचे मोठे विचारमंथन
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई! परदेशातील सायबर क्राईम कॉल सेंटरचे जाळे उघड

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई! परदेशातील सायबर क्राईम कॉल सेंटरचे जाळे उघड

शेअर मार्केट आणि आयपीओच्या नावाखाली गंडा; नवी मुंबईत सायबर कॉल सेंटर सुरू करण्यापूर्वीच ३ आरोपी जेरबंद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

थायलंड, म्यानमार कनेक्शन असलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून पर्दाफाश; २.०९ कोटींची फसवणूक

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले दिनांक: ३ एप्रिल २०२६ ,मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: शेअर मार्केट आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवी मुंबई आणि पंजाबमधील ३ आरोपींना अटक केली असून, त्यांचे धागेदोरे थायलंड आणि म्यानमारमधील सायबर क्राईम कॉल सेंटर्सशी जोडलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

फिर्यादीला शेअर बाजार आणि आयपीओमध्ये पैसे गुंतवल्यास भरघोस परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी दाखवले होते. विश्वास संपादन करून आरोपींनी फिर्यादीकडून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर २.०९ कोटी रुपये भरून घेतले. मात्र, कोणताही परतावा न मिळाल्याने आणि गुंतवलेली रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणारे तपास सुरू केला असता, फसवणुकीची रक्कम नवी मुंबईतील ‘Aarshil Industries Private Limited’ नावाच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. या माहितीवरून पोलिसांनी नवी मुंबईत सापळा रचून सुशील भगवान जुवाटकर याला ताब्यात घेतले.

सुशील जुवाटकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याचे साथीदार पंकज राज कपूर आणि निश्चल टंकबीर बरेयली हे बँकॉक (थायलंड) आणि म्यानमार येथील सायबर कॉल सेंटर्समध्ये काम करून भारतात परतल्याची माहिती मिळाली. हे आरोपी नवी मुंबईत नवीन सायबर कॉल सेंटर सुरू करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

१. सुशील भगवान जुवाटकर (वय ४२, रा. नेरूळ, नवी मुंबई): रिअल इस्टेट व्यावसायिक.

२. पंकज राज कपूर (वय ३८, रा. जालंधर, पंजाब): बँकॉक/म्यानमार कॉल सेंटरमधील माजी कर्मचारी.

३. निश्चल टंकबीर बरेयली (वय २७, रा. दार्जिलिंग, प. बंगाल): बँकॉक/म्यानमार कॉल सेंटरमधील माजी कर्मचारी.

  • ०६ मोबाईल फोन, ०३ पासपोर्ट

  • ०३ POS मशीन्स, ०२ लॅपटॉप, ०२ हार्ड डिस्क

  • ०२ क्यूआर कोड स्कॅनर, १२ विविध कंपन्यांचे शिक्के

  • २४ विविध बँकांच्या चेकबुक किट्स आणि ०५ डेबिट कार्ड्स

तसेच, पोलिसांनी तपासादरम्यान फिर्यादीचे ६२ लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये गोठवले (Hold) आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि त्यांच्या पथकाने केली. सरकारी अभियोक्ता सूरज मोहिते यांनी न्यायालयात आरोपींची पोलीस कोठडी मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!