news
Home पिंपरी चिंचवड प्राधिकरण चिंचवड मंडलाचा पुढाकार! कार्यकर्त्यांसाठी संघटन कौशल्य आणि समाज विकासावर मंथन

प्राधिकरण चिंचवड मंडलाचा पुढाकार! कार्यकर्त्यांसाठी संघटन कौशल्य आणि समाज विकासावर मंथन

'अंत्योदय' आणि 'राष्ट्र प्रथम' विचारांचे धडे; शहराध्यक्ष बापू काटे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण वर्ग संपन्न | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाच्या माध्यमातून राष्ट्रसेवेचा संकल्प; आकुर्डीत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: ३ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

आकुर्डी: भारतीय जनता पार्टी, प्राधिकरण चिंचवड मंडलाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचे भव्य आयोजन आकुर्डी येथील हॉटेल सिल्वर ७ येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणाद्वारे कार्यकर्त्यांमध्ये समाज विकास, संघटन कौशल्य आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक प्रबळ करण्याचा संकल्प करण्यात आला.

याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्राधिकरण चिंचवड मंडलाचे अध्यक्ष जयदीपभाऊ खापरे यांनी या महाअभियानाचे अत्यंत नेटके आणि शिस्तबद्ध नियोजन केले होते.

प्रशिक्षणादरम्यान प्रामुख्याने ‘समाज विकास’ आणि ‘संघटन कौशल्य’ या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. भाजपची कार्यपद्धती आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा ‘अंत्योदय’ विचार (समाजातील शेवटच्या घटकाचा विकास) तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे कसा पोहोचवता येईल, याचे तांत्रिक व वैचारिक प्रशिक्षण यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आले.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष शत्रुघ्न ऊर्फ बापू काटे म्हणाले की, “पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार घेऊनच भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता अहोरात्र काम करत असतो. अशा प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण होते, ज्यामुळे समाजाचे क्लिष्ट प्रश्न सोडवण्यास मोठी मदत होते. जयदीप खापरे आणि त्यांच्या टीमने राबवलेले हे अभियान पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी मैलाचा दगड ठरेल.”

या प्रशिक्षण वर्गाला आमदार सौ. उमाताई खापरे, सचिनदादा पटवर्धन, संघटन सरचिटणीस मोरेश्वरभाऊ शेडगे, सरचिटणीस सौ. वैशालीताई खाडे, शितल ऊर्फ विजयदादा शिंदे, अनुपदादा मोरे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी घेतलेल्या राष्ट्रसेवेच्या प्रतिज्ञेने या महाअभियानाची यशस्वी सांगता झाली. आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष विस्ताराच्या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!