news
Home अकोला मुर्तीजापूरमध्ये अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश! राष्ट्रीय महामार्गावर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

मुर्तीजापूरमध्ये अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश! राष्ट्रीय महामार्गावर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

अनभोरा शिवारात सापळा रचून पल्सर दुचाकीसह २०० दारूच्या बाटल्या जप्त; आरोपी प्रदीप येदवर पोलिसांच्या ताब्यात | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुर्तीजापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकीवरून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा जेरबंद; ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

 

 

अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ५ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला/मुर्तीजापूर: मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील अनभोरा ग्राम येथील प्रवासी निवाऱ्याजवळ सापळा रचून अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास मुर्तीजापूर ग्रामीण पोलिसांना अवैध दारू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे आणि त्यांच्या पथकाने अनभोरा येथील प्रवासी निवाऱ्याजवळ दोन पंचांच्या उपस्थितीत छापा (प्रो-रेड) टाकला.

यावेळी आरोपी प्रदीप सुभाष येदवर (वय ३९ वर्ष, रा. अनभोरा) हा त्याच्या पल्सर मोटारसायकलवरून देशी दारूची अवैध वाहतूक करताना रंगेहात मिळून आला.

१) देशी दारू: ९० मिलीच्या एकूण २०० सीलबंद बाटल्या (किंमत अंदाजे १०,०००/- रुपये).

२) वाहन: लाल-काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटारसायकल (क्र. MH 30 BT 6244) (किंमत अंदाजे ४५,०००/- रुपये).

  • एकुण जप्त मुद्देमाल: ५५,०००/- रुपये.

सदर प्रकरणी आरोपी प्रदीप येदवर याच्याविरुद्ध मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा (अप.नं. १७१/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवि जाधव (ब.नं. ११६) करत आहेत.

ही यशस्वी कारवाई मुर्तीजापूर ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चंदन वानखडे, हेड कॉन्स्टेबल राजू डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल शंकर खेडकर, रोहित ठाकूर आणि होमगार्ड सैनिकांच्या पथकाने पार पाडली.

परिसरातील अवैध धंद्यांविरुद्ध मुर्तीजापूर ग्रामीण पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!