news
लुटियन्स दिल्लीतील ‘उच्चभ्रूंचा’ अड्डा बंद! साम्राज्यवादी मानसिकतेच्या ‘दिल्ली जिमखाना क्लब’वर मोदी सरकारचा हातोडाप्रशासनाचा पाठीचा कणा असलेल्या महसूल यंत्रणेला अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडक ताकीद! आठवड्यातून एक दिवस गावपातळीवर तपासणी बंधनकारकपिंपरी-चिंचवड शहर १५ दिवस हाय अलर्टवर! पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकरांकडून जमावबंदीचे कडक आदेश जारी“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन‘एआय फॉर सायन्स’च्या नव्या सुवर्णयुगाची नांदी! जगप्रसिद्ध ‘डॅडलस’ नियतकालिकात ३३ जागतिक वैज्ञानिकांचे मोठे विचारमंथन
Home नागपूर उपराजधानीत स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ! गणेशपेठ पोलिसांनी लावला परिसरात वेढा

उपराजधानीत स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ! गणेशपेठ पोलिसांनी लावला परिसरात वेढा

महिनाभरापासून इमारतीत पडून होती बॅग; काटोलमधील स्फोटाशी कनेक्शन असण्याची शक्यता, तपास सुरू | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नागपूरमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ; दोसर भवन चौकात जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने भीतीचे वातावरण

 

 

नागपूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ८ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

नागपूर: उपराजधानीतील गजबजलेल्या दोसर भवन चौकातील लांजेवार इमारतीत बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने आज शहरात प्रचंड खळबळ उडाली. या माहितीनंतर पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईत इमारतीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आणि स्फोटके आढळून आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. खबरदारीचा उपाय म्हणून सेंट्रल एव्हेन्यूकडून बजेरियाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. या परिसरात सरस्वती हायस्कूल आणि एक पेट्रोल पंप असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष सतर्कता बाळगली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (BDDS) पाचारण करून संपूर्ण इमारतीची कसून तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान पथकाला एका बॅगेत खालील स्फोटक साहित्य आढळले:

  • १५ जिलेटीनच्या कांड्या

  • ५० डिटोनेटर

  • ८ कनेक्टर

धक्कादायक बाब म्हणजे, ही स्फोटकांनी भरलेली बॅग गेल्या महिनाभरापासून याच इमारतीत पडून होती. प्राथमिक अंदाजानुसार, ही स्फोटके १ मार्च रोजी काटोल येथील एसबीएल (SBL) कंपनीत झालेल्या स्फोटाशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

दोसर भवन चौक हा मोमीनपुरा या संवेदनशील परिसराजवळ असल्याने पोलिसांनी तातडीने कडक बंदोबस्त तैनात केला आहे. यापूर्वी ९ डिसेंबर २०२४ रोजी देखील गणेशपेठ बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याची खोटी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. मात्र, आज प्रत्यक्ष स्फोटके आढळल्याने प्रशासनाने ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली आहे.

सध्या ही स्फोटके सुरक्षित स्थळी हलवण्यात आली असून, ती इमारतीत कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवली, याचा शोध गणेशपेठ पोलीस घेत आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!