news
Home पिंपरी चिंचवड विधायक कामातून साजरा झाला आमदार शंकरभाऊ जगतापांचा वाढदिवस! शालेय विद्यार्थ्यांना भेटल्या ‘भोजन प्लेट्स’

विधायक कामातून साजरा झाला आमदार शंकरभाऊ जगतापांचा वाढदिवस! शालेय विद्यार्थ्यांना भेटल्या ‘भोजन प्लेट्स’

नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या हस्ते वाटप; रहाटणी परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला दिले प्राधान्य | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम; मनपा शाळांत ‘माध्यान्ह भोजन’ प्लेट्सचे वाटप

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: ८ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड: चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘शंकरभाऊ जगताप मित्र परिवारा’च्या वतीने शहरात एक सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात आला. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सन्मानपूर्वक माध्यान्ह भोजन मिळावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांना भोजन प्लेट्सचे वाटप करण्यात आले.

शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना एका चांगल्या दर्जाच्या प्लेटमध्ये जेवण मिळावे, या हेतूने रहाटणी प्रभागातील महानगरपालिका शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला.

या प्लेट्स वितरण समारंभाप्रसंगी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन, नगरसेविका सविताताई खुळे, नगरसेविका अर्चनाताई तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती. या लोकप्रतिनिधींच्या हस्ते चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्लेट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस डामडौल टाळून विधायक कामांनी साजरा केल्याबद्दल शिक्षक आणि पालकांनी मित्र परिवाराचे कौतुक केले आहे. “विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होईल,” असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी यावेळी सांगितले की, शंकरभाऊंच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात नेहमीच असे लोकोपयोगी उपक्रम राबवण्यावर आमचा भर असतो आणि विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणे ही आमची प्राथमिकता आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!