news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड आरटीओ प्रशासनाला निवेदन; रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रश्नांवर काशिनाथ नखाते आक्रमक

पिंपरी-चिंचवड आरटीओ प्रशासनाला निवेदन; रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रश्नांवर काशिनाथ नखाते आक्रमक

'आनंद दिघे कल्याणकारी मंडळा'तील नोंदणी सुलभ करण्याची मागणी; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिले आश्वासन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा; कष्टकरी रिक्षा-टॅक्सी संघर्ष महासंघाची मागणी

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: राज्य शासनाने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्थापन केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’त नोंदणीचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष अभियान राबवावे, अशी मागणी कष्टकरी रिक्षा-टॅक्सी संघर्ष महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले.

महाराष्ट्र राज्यात गेल्या महिन्यात केवळ १,३३३ चालकांनी नोंदणी केल्याचे चित्र समोर आले आहे. महासंघाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचीही विधानभवन, मुंबई येथे भेट घेऊन या विषयावर चर्चा केली होती. मंडळाचे नोंदणी शुल्क ५०० रुपये आणि वार्षिक शुल्क ३०० रुपये असे एकूण ८०० रुपये भरावे लागतात. हे शुल्क इतर मंडळांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालक नोंदणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात हजारो रिक्षा चालक आहेत, मात्र कल्याणकारी मंडळातील नोंदणी अत्यंत कमी आहे. ही नोंदणी वाढवण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेऊन स्वतंत्र अभियान राबवावे आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी, रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


  • शुल्क कपात: राज्यातील इतर मंडळांप्रमाणे रिक्षा चालकांसाठीचे नोंदणी शुल्क कमी करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत.

  • विशेष अभियान: प्रत्येक रिक्षा स्टँडवर किंवा प्रमुख चौकात नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे.

  • योजनांची माहिती: कल्याणकारी मंडळामार्फत मिळणाऱ्या विविध सरकारी योजनांची माहिती तळागाळातील चालकांपर्यंत पोहोचवावी.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, नाना कसबे, राजू बोराडे, अतिश वडमारे, विशाल सरवदे, राजू व्हनमाने, रामभाऊ कांबळे, दिनकर खांडेकर, सुभाष वाशिमकर आदींसह मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!