news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर प्रशासन सकारात्मक! बोगस नावांची छाटणी करून खऱ्या विक्रेत्यांना न्याय देण्याचे आयुक्तांचे संकेत

पिंपरी-चिंचवडमधील फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर प्रशासन सकारात्मक! बोगस नावांची छाटणी करून खऱ्या विक्रेत्यांना न्याय देण्याचे आयुक्तांचे संकेत

पथ विक्रेता प्रमाणपत्रांचे वाटप आणि हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीला मिळणार गती; काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली भेट | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच बैठक; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आश्वासन

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , १० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आचारसंहिता व इतर कारणांमुळे थांबलेली ‘पथ विक्रेता’ (स्ट्रीट वेंडर) कायद्याची प्रक्रिया आता गतीने पुढे नेली जाईल. या संदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकरच विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि पथ विक्रेता समितीच्या शिष्टमंडळाने आज आयुक्तांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल शिष्टमंडळाने डॉ. सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले. त्यानंतर शहरातील फेरीवाल्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाने प्रामुख्याने खालील मागण्या मांडल्या:

  • प्रमाणपत्रांचे वाटप: शहरातील ‘अ’ ते ‘ह’ या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ज्या विक्रेत्यांनी शुल्क भरले आहे, त्यांना त्वरित प्रमाणपत्रे देण्यात यावीत.

  • हॉकर्स झोनची अंमलबजावणी: हॉकर्स झोन निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर बैठका घ्याव्यात.

  • बोगस नावांची छाटणी: सर्वेक्षणात भ्रष्टाचार करून घुसडलेली बोगस नावे रद्द करावीत.

  • सोयीसुविधा आणि संरक्षण: हॉकर्स झोनच्या ठिकाणी आवश्यक नागरी सोयीसुविधा पुरवाव्यात आणि तोपर्यंत फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवावी.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरात हॉकर्स झोनची प्रक्रिया राबवणे अत्यंत गरजेचे असून, पथ विक्रेता समितीच्या माध्यमातून यावर तातडीने तोडगा काढला जाईल. लवकरच सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, अलका रोकडे, सलीम डांगे, महासंघाचे कार्याध्यक्ष इरफान चौधरी, मनोज यादव, सलीम शेख, सुनील भोसले, विशाल चंपावत, नंदू आहेर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!