news
‘विद्यार्थ्यांनी मोबाईल सोडून वाचनाची कास धरत स्वच्छतादूत बनावे’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन!‘शास्त्रीय गायन, व्यंगचित्र व रांगोळी स्पर्धेत पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांचे यश’; कलागुणांच्या जोरावर गाजवली आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा!‘विद्यार्थ्यांनी एथिकल हॅकिंगच्या माध्यमातून सुरक्षित डिजिटल जग घडवावे’; पिंपरी चिंचवड विद्यापीठात सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा सल्ला!‘शासकीय अनुदानाचे आमिष दाखवणाऱ्या बनावट लिंक्सपासून दूर राहा’; सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन!‘भ्रष्टाचाराविरोधात महापालिकेची कठोर कारवाई’; मुख्य अभियंता प्रमोद ओंभासेसमवेत विभागीय चौकशीचे आदेश!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या नद्यांना मिळणार नवसंजीवनी! मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पीएमआरडीए मुख्यालयात प्रकल्पांचा आढावा

पिंपरी-चिंचवडच्या नद्यांना मिळणार नवसंजीवनी! मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पीएमआरडीए मुख्यालयात प्रकल्पांचा आढावा

नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून प्रदूषणाच्या कारणांचा घेतला शोध; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि संवर्धन प्रकल्पांना मिळणार गती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

इंद्रायणी व पवना नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी ठोस पावले; मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डीत आढावा बैठक

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ११ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या इंद्रायणी व पवना नद्यांच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरणीय प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी मंत्री महोदयांनी दोन्ही नद्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला.

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान, सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाणे, नदीकाठचा साचलेला घनकचरा आणि जलपर्णीची समस्या यांसारख्या गंभीर बाबी समोर आल्या. यावर महापौर रवि लांडगे यांनी नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (STP) क्षमता वाढविणे, नाल्यांचे ‘इंटरसेप्शन व डायव्हर्जन’ करणे आणि नदीकाठ संवर्धन प्रकल्पाला गती देण्यासारख्या ठोस उपाययोजना सुचविल्या.

नदी पाहणीनंतर आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी शहरातील विविध विकास प्रकल्पांची माहिती घेत, पर्यावरणीय संतुलन राखून कामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रकल्पांना होणारी दिरंगाई टाळण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीला महापौर रवि लांडगे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


“इंद्रायणी आणि पवना नद्या शहराचा पर्यावरणीय आरसा आहेत. या नद्यांची प्रदूषणमुक्ती हा केवळ प्रकल्प नसून तो शहराच्या शाश्वत विकासाचा कणा आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पिंपरी-चिंचवडला जलस्वयंपूर्ण आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.”

— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड

या आढावा बैठकीमुळे भविष्यात नद्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या निधीची तरतूद आणि ठोस धोरणात्मक निर्णय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!