news
Home पिंपरी चिंचवड नाथपंथी डवरी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम! ११०० हून अधिक दाखले मिळवून देत वंचितांना दिला आधार

नाथपंथी डवरी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम! ११०० हून अधिक दाखले मिळवून देत वंचितांना दिला आधार

पिंपरीतील सावित्रीबाई फुले सभागृहात रंगला सन्मान सोहळा; प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे अभिषेक बारणे यांचे आश्वासन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भटके विमुक्त वंचित समाज बांधवांना दाखले वितरण व सन्मान समारंभ उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी मनोज प्रधान, १२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भटके विमुक्त समाजातील बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘नाथपंथी डवरी सामाजिक संस्था’ आणि ‘भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र’ यांच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत, ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ शासकीय कागदपत्र शिबिराचा भाग म्हणून, भटके विमुक्त जाती-जमातीतील १७३ लाभार्थींना जातीच्या दाखल्यांचे वितरण आणि सन्मान सोहळा नुकताच पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी होते.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे उपस्थित होते. आपल्या मनोगतात अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले की, “भटके विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सदैव तत्पर असून, समाज बांधवांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”

डॉ. संजय पुरी यांनी आपल्या भाषणात सर्व समाज घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले. समरसता गतिविधीचे विलास लाडगे यांनी हिंदू संमेलनातील सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले, तर आर.एस.एस.चे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेची माहिती दिली.

या शिबिराच्या माध्यमातून नाथपंथी डवरी, वडार, रामोशी, बंजारा, सिक्कलगर आणि कंजारभाट या समाजातील एकूण १७३ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, संस्थेने आतापर्यंत भटके विमुक्त समाजातील ११०० पेक्षा अधिक नागरिकांना जातीचे दाखले मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण केले आहे.

यावेळी रघुवीर शेलार, शिरीष भालेकर, भाई विशाल जाधव, आनंदा कुदळे, ॲड. हर्षद नढे पाटील, किशोर शिंदे, राजाभाऊ कुदळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अनुलोम पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबू कोळी यांनी केले, तर सूत्रसंचालन काका शितोळे यांनी केले. उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे नियोजन भाई विशाल जाधव यांनी केले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख संयोजक ललित कासार, सहसंयोजक अरुण कोष्टी, ॲड. मुकुंद यदमळ, राजू निकम, कृष्णा डवरी, रोहित राजपूत आणि बाबू कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!