news
Home पिंपरी चिंचवड स्थायी समितीचा विकासकामांचा धडाका! शिक्षण आणि आरोग्यासह पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब

स्थायी समितीचा विकासकामांचा धडाका! शिक्षण आणि आरोग्यासह पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब

शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर; रस्ते विकास व फायर ऑडिटच्या कामांना गती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि स्वच्छता या विषयांवरील अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

या सभेस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • शिक्षण: महापालिका शाळांमधील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवणे, स्मार्ट किड्स फिटनेस इक्विपमेंट खरेदी करणे आणि आकुर्डी येथील एमएससीआयटी केंद्राचे नूतनीकरण करणे.

  • आरोग्य व सुरक्षा: आकुर्डी हॉस्पिटल, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह आणि विविध शाळांमध्ये ‘फायर सेफ्टी ऑडिट’ नुसार देखभाल-दुरुस्तीची कामे करणे. तसेच तालेरा व जिजामाता रुग्णालयातील विद्युत व ईटीपी विषयक कामांना मंजुरी.

  • स्वच्छता व पर्यावरण: शहर कचरामुक्त करण्यासाठी जनजागृती संस्थांची नेमणूक, मैला शुद्धीकरण प्रकल्पांचे संचलन आणि ‘माझी वसुंधरा’ व ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत प्रकल्पांसाठी एजन्सी निवडणे.

  • पायाभूत सुविधा व रस्ते: वाकड, पुनावळे, ताथवडे परिसरातील नवीन रस्ते विकसित करणे, नवी व जुनी सांगवीत नवीन बोअरवेल घेणे, रहाटणी व थेरगाव येथे फुटपाथ व नाला दुरुस्तीची कामे करणे.

  • जलनिस्सारण: कृष्णा नगर, पूर्णानगर, घरकुल प्रकल्प व चिखली परिसरात पावसाळ्यापूर्वी जलनिस्सारण व्यवस्था सुधारणे आणि नालेसफाईसाठी मशिनरी पुरवणे.

महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची प्रभावी वसुली व्हावी आणि उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी रेडिओ स्टेशनवरून जाहिरात प्रसिद्ध करण्यासही समितीने मान्यता दिली आहे. तसेच, उद्याने व वृक्ष संवर्धन विभागाच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन मोबाईल ॲप व वेब प्रणाली विकसित केली जाणार आहे.


“शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आजच्या सभेत आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. शाळांचे सक्षमीकरण, रुग्णालयांची सुरक्षा आणि पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई या विषयांना आम्ही प्राधान्य दिले आहे.”

– अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!