news
Home पिंपरी चिंचवड जनगणना २०२७ साठी पिंपरी-चिंचवड प्रशासन सज्ज! आयुक्तांकडून वाकडमधील प्रशिक्षण केंद्राची पाहणी

जनगणना २०२७ साठी पिंपरी-चिंचवड प्रशासन सज्ज! आयुक्तांकडून वाकडमधील प्रशिक्षण केंद्राची पाहणी

कस्पटे वस्ती येथील केंद्राला दिली भेट; १६ मे पासून सुरू होणार जनगणनेचा पहिला टप्पा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जनगणना मोहिमेला वेग; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला प्रशिक्षण केंद्रांचा आढावा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला आता वेग आला आहे. आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाकड-कस्पटे वस्ती येथील कै. मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळेतील प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

आयुक्तांनी प्रगणक, पर्यवेक्षक आणि फील्ड ट्रेनर्सना दिल्या जाणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शनाची माहिती घेतली. प्रशिक्षणादरम्यान घरगुती सर्वेक्षणाची पद्धत, अचूक माहिती संकलन आणि नागरिकांशी करायचा संवाद यावर विशेष भर दिला जात आहे. विशेषतः यावेळेस होणाऱ्या डिजिटल जनगणनेसाठी ॲप-आधारित डेटा एन्ट्री आणि माहिती पडताळणी प्रक्रियेचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जात आहे.

संवाद साधताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, जनगणना ही केवळ आकडेवारी नसून भविष्यातील विकासाचा आधार आहे. ही प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच सर्व महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जनगणना स्वयं-नोंदणी (Self Enumeration) करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

  • पहिला टप्पा: १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

  • प्रशिक्षण: अ, ब, क, ड, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आजपासून तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे.

  • उद्यापासून सुरुवात: इ आणि फ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्यापासून प्रशिक्षण वर्ग सुरू होतील.


“जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असून त्यावर देशाच्या विकासाचे नियोजन अवलंबून असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण जनगणना पूर्ण करणे आवश्यक आहे.”

— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

“जनगणना प्रशिक्षणामुळे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रत्यक्ष कामकाजासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येत आहेत. यामुळे माहिती संकलन अधिक अचूक आणि जलद होण्यास मदत होईल.”

— कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

“प्रशिक्षणाच्या माध्यमातून तांत्रिक बाबींसोबतच नागरिकांशी संवाद साधण्याचे कौशल्य दिले जात आहे. डिजिटल प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होईल.”

— सचिन पवार, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!