news
पुण्याहून मुंबईकडे जाताना फॉर्च्युनर कारची टेम्पोला भीषण धडक; कारमधील एक जण गंभीर जखमी, तर तिघे सुदैवाने बचावलेसुगम बदली आणि शासकीय लाभ मिळवण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर; त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर मोठी कारवाईशिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयअभ्यागतांच्या तक्रारी व निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेत स्थळपाहणी व तातडीने कार्यवाहीचे आदेश; दर गुरुवारी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीवपक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्याला मोठी संधी
Home पिंपरी चिंचवड निगडीत साहित्याचा जागर! जागतिक पुस्तक दिनी ‘मधुगंधित हेमाक्षरे’ काव्यसंग्रह प्रकाशित

निगडीत साहित्याचा जागर! जागतिक पुस्तक दिनी ‘मधुगंधित हेमाक्षरे’ काव्यसंग्रह प्रकाशित

जागतिक पुस्तक दिनी कवयित्री हेमांगी बोंडे यांच्या 'मधुगंधित हेमाक्षरे' काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक, त्यातूनच मानवी संस्कृती जिवंत राहते!’ – डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

निगडी: “पुस्तक हे केवळ कागदांचा संच नसून ते ज्ञानाचे प्रतीक आहे. आज युद्धाच्या सावटाखाली जग काळवंडले असताना, पुस्तकांतून मिळणारे ज्ञानच जगातील माणुसकी आणि मानवी संस्कृती वाचवू शकते,” असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने निगडी प्राधिकरणातील शांता शेळके सभागृहात आयोजित पुस्तकपूजन आणि कवयित्री हेमांगी बोंडे लिखित ‘मधुगंधित हेमाक्षरे’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मसापच्या सदस्यांनी स्वलिखित व आवडत्या पुस्तकांचे पूजन केले. यावेळी शहरातील ज्येष्ठ पुस्तक विक्रेते राजू कासट आणि सुनील टेपाळे यांचा अभय कुलकर्णी व ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

कवयित्री हेमांगी बोंडे यांनी आपल्या मनोगतातून या संग्रहातील वैविध्य उलगडले. सेवानिवृत्तीनंतर ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’च्या माध्यमातून शिकलेले कवितेचे विविध प्रकार त्यांनी या संग्रहात गुंफले आहेत. यामध्ये प्रार्थना, आरती, भारुड, लावणी यांसारख्या पारंपारिक प्रकारांपासून ते विडंबन, अक्षर छंद रचना, वृत्तबद्ध कविता, गझल, हायकू, दोहा आणि मायबोली लेवा गणबोलीतील कवितांचा समावेश आहे. “हा संग्रह प्रत्येक माध्यमिक ग्रंथालयात असावा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

  • राजन लाखे: “प्रज्ञा, प्रतिभा आणि प्रगल्भतेचा समन्वय म्हणजे ‘मधुगंधित हेमाक्षरे’ हा काव्यसंग्रह होय.”

  • प्रा. किसन वराडे: “कवयित्रीची प्रतिभा सर्वस्पर्शी असून त्यांच्या कवितांमधून समाजाभिमुख संवेदनशीलता प्रकट होते.”

  • प्रा. संजय पवार: “जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांचा प्रचार व प्रसार करण्याची ही उत्तम सुसंधी आहे.”

या सोहळ्यास प्रा. डॉ. रजनी शेठ, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे मुरलीधर लहाने, माधव बरहाटे, चित्रा बरहाटे, श्रीकृष्ण रेवणवार व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन विनिता श्रीखंडे, नीलिमा फाटक, कमल सोनजे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी केले. किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले, तर अशोक बोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!