news
सीआयआरटी (CIRT), ऑटोसिफू आणि जगमंगल सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट २०२६’ चे ऑनलाइन उद्घाटन२० वर्षांच्या निष्ठावंत सेवेनंतर ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांचा पक्षत्याग; मूर्तिजापूरसह अकोला जिल्ह्यात पक्षाची मोठी हानी होण्याची शक्यतानागपुरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून यात्रेचा प्रारंभ; ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आक्रमकपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे ‘सिटी प्राईड SCHOOL’च्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान; उपकरणांची माहिती व प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधीकर्मचारी महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक; पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन आणि बोनस कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
Home पिंपरी चिंचवड चाकणमध्ये घरकुल प्रकल्पाच्या साहित्यावर डल्ला मारणारी टोळी जेरबंद! ३१ लाखांच्या शटरिंग प्लेट्स जप्त

चाकणमध्ये घरकुल प्रकल्पाच्या साहित्यावर डल्ला मारणारी टोळी जेरबंद! ३१ लाखांच्या शटरिंग प्लेट्स जप्त

साईडवर सापडलेल्या बेवारस दुचाकीने उघडले चोरीचे धागेदोरे; चार मुख्य आरोपींसह भंगार खरेदीदार पोलिसांच्या ताब्यात | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चाकण पोलिसांची मोठी कारवाई: प्रधानमंत्री आवास योजनेच्या साईटवरून साहित्य चोरणारी टोळी गजाआड; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २८ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चाकण: चाकण नगरपरिषद हद्दीतील राक्षेवाडी येथे सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहप्रकल्पाच्या साईटवरून २० लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम शटरिंग प्लेट्स चोरणाऱ्या टोळीचा चाकण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार मुख्य आरोपी आणि चोरीचा माल विकत घेणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राक्षेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २१० घरांचे बांधकाम सुरू आहे. १० एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बांधकाम साईटवरून २० लाख रुपये किमतीच्या २८० स्क्वेअर मीटर ॲल्युमिनियम शटरिंग प्लेट्स चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी १८ एप्रिल रोजी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. ३४०/२०२६) दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना घटनास्थळ परिसरात एक बेवारस मोटारसायकल मिळून आली. या दुचाकीचा तांत्रिक तपास करून मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने निरीक्षण केले असता, मुख्य आरोपी रामरक्षा ऊर्फ राजू धर्मराज पासवान (वय ४०, रा. सुसगाव, मुळ रा. उत्तर प्रदेश) हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

रामरक्षा पासवानच्या चौकशीतून त्याचे इतर साथीदार निष्पन्न झाले, ज्यांना येलवाडी (ता. खेड) येथून ताब्यात घेण्यात आले:

१) रामरक्षा ऊर्फ राजू धर्मराज पासवान (वय ४०)

२) स्वराज शांताराम कालापाड (वय २३)

३) स्वप्नील शांताराम कालापाड (वय २५)

४) अक्रम रफीकउल्ला खान (वय २८)

या चौघांशिवाय चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या आणखी तीन आरोपींनाही पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरलेली दोन चारचाकी वाहने, दोन मोटारसायकली आणि चोरीला गेलेल्या सर्व ॲल्युमिनियम शटरिंग प्लेट्स असा एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) मारुती जगताप, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील, तपास पथकाचे उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस अंमलदार यादव, डमडरे, कोळेकर, कोळी, लोखंडे आणि जगताप यांनी केली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!