news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये ‘वाघजाई’ आणि ‘राजमाता जिजाऊ’ संघाचा डंका! महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा दिमाखदार समारोप

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘वाघजाई’ आणि ‘राजमाता जिजाऊ’ संघाचा डंका! महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा दिमाखदार समारोप

साहिल पाटीलला बुलेट तर निकिता पडवळला चेतक गाडी; क्रीडा नगरीत खेळाडूंचा ऐतिहासिक सन्मान | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धेत पुरुष गटात ‘वाघजाई’ तर महिला गटात ‘राजमाता जिजाऊ’ संघ विजेता

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ११ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “महापौर चषक ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून राज्यातील नवोदित खेळाडूंना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची एक मोठी संधी आहे. पिंपरी चिंचवड शहर आता क्रीडा संस्कृतीला चालना देणारे शहर म्हणून ओळख निर्माण करत असून, अशा स्पर्धांमधून भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील,” असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ चा भव्य समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या चुरशीच्या लढतीत पुरुष गटात रत्नागिरीच्या वाघजाई संघाने, तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

                        पुरुष गट                                                                                                            महिला गट

१) प्रथम: वाघजाई कबड्डी संघ, रत्नागिरी (विजेता)                                                        १) प्रथम: राजमाता जिजाऊ संघ, पुणे (विजेता)

२) द्वितीय: शिवमुद्रा संघ, कोल्हापूर                                                                            २) द्वितीय: शिवशक्ती संघ, मुंबई

३) तृतीय: बारामती स्पोर्ट्स क्लब, बारामती                                                                ३) तृतीय: बारामती स्पोर्ट्स क्लब, बारामती

४) चतुर्थ: सतेज संघ, पुणे                                                                                          ४) चतुर्थ: धर्मवीर कबड्डी संघ, नंदुरबार

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांची खैरात करण्यात आली:

सर्वोत्कृष्ट खेळाडू (पुरुष): साहिल पाटील (बुलेट गाडी), अर्जुन तडस (७५ हजार रुपये व चषक).

सर्वोत्कृष्ट खेळाडू (महिला): निकिता पडवळ (चेतक गाडी), मृणाली भुवड (७५ हजार रुपये व चषक).

सर्वोत्कृष्ट चढाई: अजिंक्य पवार (पुरुष – चेतक गाडी), सोनाली शिंगटे (महिला – चेतक गाडी).

सर्वोत्कृष्ट पकड: शुभम शिंदे (पुरुष – चेतक गाडी), ऋतुजा तिगडे (महिला – चेतक गाडी).

इतर उपविजेत्यांनाही रोख ५० हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या अर्जुन आणि छत्रपती पुरस्कार विजेत्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये शकुंतला खटावकर, सूर्यकांत पाटील, संगीता सोनावणे, सायली क्रिपाळे, अमरदीप चांदुगुडे, सुनील लांडे आणि रामदास लांडगे यांचा समावेश होता.

या सोहळ्याला आमदार महेश लांडगे, आमदार सचिन अहिर, क्रीडा सभापती कैलास कुटे, उपायुक्त पंकज पाटील यांसह अनेक नगरसेवक आणि क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!